शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार म्हणाले, तुम्हीही का नाही मारले दगड ?

By admin | Updated: May 28, 2017 00:10 IST

नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करता उलटपक्षी त्यांनाच मद्यपींवर दगडफेक करण्याचा सल्ला ठाणेदारांनी दिल्याने कॅम्प स्थित नागरिक संतप्त झालेत.

नागरिक संतापले : ‘गॅलेक्सी बार’मधील मद्यपींचा कॅम्पमध्ये धुमाकूळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करता उलटपक्षी त्यांनाच मद्यपींवर दगडफेक करण्याचा सल्ला ठाणेदारांनी दिल्याने कॅम्प स्थित नागरिक संतप्त झालेत. कॅम्प परिसरातील हॉटेल गॅलेक्सी रेस्टॉरेंट अ‍ॅन्ड बार समोर शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या उच्चभ्रू वस्तीतील नागरिक संत्रस्त झाले व त्यांनी याबाबत पोलीस यंत्रणेला जाब विचारला. दरम्यान युवा स्वाभिमानचे पदाधिकारी अभिजित देशमुख यांनी रात्रीच्या सुमारास बारवर दगडफेक केली. येथील रहिवासी बार विरोधात एकवटले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील बार आणि दारू दुकाने बंद झाल्यानंतर उर्वरीत दारू दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे. त्याच मालिकेत हॉटेल गॅलक्सी रेस्टॉरेंट अ‍ॅन्ड बारमध्येही मद्यपींचा राबता वाढला आहे. हॉटेल संचालकाने रेस्टॉरेंट बंद करून बारमधून दारुची पार्सल सेवा सुरू केली आहे. बारमधून दारू घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटसमोरील पदपथावर ठिय्या देऊन मनसोक्त मद्यपान करण्याचा प्रताप मद्यपींनी सुरू केला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास काही मद्यपी अपार्टमेंटसमोरील पदपथावर मद्यपान करीत होते. दरम्यान अपार्टमेंटमधील रहिवासी माजी नगरसेविका सुजाता झाडे यांचे पती अनिल झाडे यांनी त्या मद्यपींना हटकले. मात्र मुजोर मद्यपी त्यांच्या अंगावर धावून गेले. हा गोंधळ उडताच अपार्टमेंटमधील सर्वच रहिवासी बाहेर आले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान मद्यपींनी धूम ठोकली. मद्यपी गेल्यानंतर पोलिसांनी हजेरी लावली. यावेळी नागरिकांनी पोलिसांसमोर व्यथा कथन केली असता मद्यपींना ‘तुम्हीही दगड मारून हाकलून का लावले नाही’, असा अजब सल्ला गाडगेनगरचे ठाणेदार के. एम. पुंडकर यांनी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी या बार विरोधात जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनालाही निवेदन दिले आहे. मात्र यंत्रणेकडून प्रतिसाद न मिळाल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष उफाळला आहे. वॉचमन पुरवितो दारू गॅलेक्सी हॉटेल अ‍ॅन्ड बार बाहेरून बंद असले तरी तेथील वॉचमन दारुची पार्सल सेवा पुरवित असल्याचे नागरिकांनी सांगितले. बारमधून दारुचे पार्सल घेणे व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पदपथावर बसून पिणे असा प्रकार दररोज चालत असतो. या त्रासामुळे परिसरातील महिलांना बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे.पार्किंगची जागा हडपलीमाजी नगरसेवक सुजाता झाडे यांच्यानुसार हॉटेल गॅलेक्सीला स्वतंत्र पार्किंग नाही. मात्र महापालिका वा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर मेहेरबान आहे. गॅलक्सी बारकडून वापरण्यात येणारी पार्किंगची जागा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.