शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

-तरच बांधकाम परवानगी

By admin | Updated: November 9, 2016 00:11 IST

घनकचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक करण्यात आले असून ...

महापालिकेच्या सूचना : सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य अमरावती : घनकचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक करण्यात आले असून त्या अनुषंगाने मोठ्या इमारतींमध्ये ‘वेस्ट वॉटर रियूज’ प्रकल्प उभारणे देखील बंधनकारक करण्यात यावे, त्याशिवाय बांधकामाची परवानगीच देऊ नये, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सहायक संचालक, नगररचना विभागाला दिले आहेत. ८ एप्रिल २०१६ रोजी जारी निर्देशांनुसार मोठ्या इमारती, ग्रुप हाऊसिंग, फ्लॅट्स, अपार्टमेंट, हॉटेल्स, मंगल कार्यालय, लॉन्स अशा इमारतींमधून बाहेर पडणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाची अमलबजावणी करताना अतिरिक्त आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने मनपाक्षेत्रात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत, द्रवखत किंवा बायोगॅस निर्मिती करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. सुक्या कचऱ्याचे पुनर्वर्गिकरण (रिड्यूस, रियूज, रिसायकल) करणे सुद्धा बंधनकारक आहे. मोठ्या इमारतींमध्ये किचन, बेसिन, बाथरूम, वॉशरूममधून निर्माण होणाऱ्या पाण्यावर ‘पुनर्प्रक्रिया प्रकल्प’ उभारणी करणे बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश ‘एडीटीपींना देण्यात आले आहेत. इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी भूगर्भामध्ये जिरविण्याकरिता किंवा ते पाणी पुन्हा शौचालयाच्या वापराकरिता स्वतंत्र पाईप लाईनची व्यवस्था करण्यात यावी, याव्यतिरिक्त अधिकच्या पाण्याचा बागेकरीता वापर करणे बंधनकारक करावे, बांधकाम परवानगी देताना यासर्व बाबी आनिवार्य कराव्यात, तसेच पूर्णत्वाचा दाखला व भोगवट प्रमाणपत्र देताना यासर्व बाबींच्या पूर्ततेची खात्री करावी आणि मगच इमारतीचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असे सूचनावजा निर्देश एडीटीपींना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)मंगल कार्यालयाचे किचन जप्त वारंवार नोटीस आणि सूचना देऊनही बायागॅस प्रकल्प न उभारणाऱ्या मंगल कार्यालयांच्या किचनवर जप्ती आणली जाणार आहे. मंगल कार्यालये, लॉन आणि हॉटेल्समधील कचऱ्यांचे वर्गिकरण करुन त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्या-त्या प्रतिष्ठानांची असल्याचे महापालिकेकडून निश्चित करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्समधील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रतिष्ठानधारकांचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र, त्या आवाहनाला दाद न मिळाल्याने आता पहिल्या टप्प्यात मंगल कार्यालय आणि लॉनच्या किचनला सिल करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचा आदर्श प्रयोग राबविणार पुणे महापालिकेद्वारे स्वच्छ भारत अभियानासंदर्भात जोरदार जनजागृती करण्यात आली. प्रत्येक घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी संबंधित घरमालकांवरच निश्चित केल्याने तेथे ठिकठिकाणी सांघिक स्वरूपाचे गटनिहाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ‘स्वच्छ’ अ‍ॅपचा वापर वाढला असून घरातील कचरा महापालिका उचलणार नाही, असे बजावल्याने तेथे सकारात्मक बदल घडून आला आहे. हा प्रयोग अमरावतीत राबविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी पुणे येथे जावून घनकचरा व्यवस्थापचे धडे गिरविले.