शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस बैठकीला शिक्षणाधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: December 31, 2015 00:15 IST

पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या स्कूल बस समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.

अंमलबजावणीवरुन प्रश्नचिन्ह : अन्य अधिकाऱ्यांची उपस्थितीअमरावती : पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या स्कूल बस समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. ज्या यंत्रणेकडे अंमलबजावणीची जबाबदारी आहे. त्या यंत्रणेचे प्रमुखच बैठकीला अनुपस्थित असेल तर तशा सूचना द्यायच्या कुणाला, असा प्रश्न बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पोलीस, महापालिका आयुक्त आणि आरटीओ सहशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. स्कूल बस नियमावलीची सर्वत्र अंमलबजावणी करण्यासाठी शाळा, शहर, जिल्हा पातळीवर परिवहन आणि स्कूल बस सुरक्षितता समिती नेमली आहे. महापालिकेच्या हद्दीत पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील शाळांसाठी पोलीस अधीक्षक या समितीचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेणे आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या समितीवर आहे. त्यासाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेण्याचा आदेश आहे. त्यानुसार २० जूनला बैठक पार पडली. दुसरी वार्षिक बैठक आज घेण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हीताचा मुद्या असतांना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (प्रतिनिधी)