शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात दुकाने बंदच्या कारणावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले.

ठळक मुद्देदोन्ही गट आमने-सामने : आॅटो केले बंद, एसटी बस रोखल्या, प्रवाशांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या कारणावरून बुधवारी बडनेरा शहरात दुकाने बंद करताना तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही काळ दोन्ही गट आमने-सामने आले. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने तणाव निवळला. दरम्यान जमावाने जुनीवस्तील ऑटो बंद करतावेळी एसटी बस रोखल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले. प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याने पोलिसांनी जमावाला रस्त्याच्या बाजूला केले. रोखून ठेवलेल्या एसटी बस, ऑटो पुन्हा सुरू केले. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जमावाला संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला. ही लढाई केंद्र सरकारविरूद्ध असून, सामान्य माणसाला त्रास देऊ नका, अशी भूमिका घेतली. त्यानंतर जमावाने रस्त्यावरील गर्दी कमी केली. नवीवस्ती भागात जमावाने दुकाने बंद करताना बळजबरी केल्याच्या कारणावरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास दबाव टाकून दुकाने बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नवीवस्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप, सेनेसह व्यापारी एकवटले होते. बंद ठेवायचे की नाही? ही बाब ऐश्चिक असून, बळजबरी कशासाठी यावरून येथे दोन्ही गट आमने-सामने आलेत. काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ‘भारत माता की जय’, जय भवानी-जय शिवाजी’च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. घटनास्थळी हजर असलेले सहायक पोलीस आयुक्त शोहेल शेख, ठाणेदार शरद कुळकर्णी यांनी दोन्ही गटाची समजूत काढली. कालांतराने तणाव निवळला, हे विशेष.दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात बडनेऱ्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जमावाने दुकाने बंद केल्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद कायम होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असताना ते पुन्हा सुरू करा, अशा सूचना एका गटाने केल्यानंतरही व्यावसायिकांनी मात्र दुकाने दुपारी १२ वाजेनंतरच सुरू केल्याचे दिसून आले. बडनेऱ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद