शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणातील बुद्ध मूर्ती हटविल्याने जवाहरनगरात तणाव

By admin | Updated: January 13, 2015 22:51 IST

महापालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी पहाटे ४ वाजतापासून विलासनगर भागातील काही अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरु करण्यात आले होते.

अमरावती : महापालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी पहाटे ४ वाजतापासून विलासनगर भागातील काही अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरु करण्यात आले होते. दरम्यान जवाहरनगरात आरक्षित जागेवर असलेली बुद्ध मूर्ती हटविण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष उफाळून आला होता. या रोषामुळे जवाहरनगरात पहाटेच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने तणाव निवळला. जवाहरनगरातील एका शासकीय जागेवर महापालिकेने उद्यान निर्मितीकरिता जागा आरक्षित केली होती. मात्र २०१३ मध्ये एका समुदयाने बुद्ध मूर्तीची स्थापना या आरक्षित जागेवर केली होती. त्यावेळी या मूर्तीच्या स्थापनेबाबत पकंज काळे यांच्यासह ६ जणांनी आक्षेप नोंदविला होता. ही मूर्ती हटविण्यासाठी काही नागरिकांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन याचिका दाखल केली होती. पहाटे ४ वाजता कारवाईयाप्रकरणी जानेवारी २०१४ मध्ये सुनावणी सुरु झाल्यावर सप्टेंबर महिन्यात मूर्ती हटविण्याचा निकाल दिला. मात्र महापालिकेकडून कारवाई केली नव्हती. त्यामुळे न्यायालयाकडून महापालिकेला त्या अनधिकृत अतिक्रमाबद्दल नोटीस पाठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नगररचना विभागाचे जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे, अतिक्रमण विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, निरीक्षक उमेश सवई यांच्या नेत्तृत्वात पथकांने जवाहर नगरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. दरम्यान मूर्ती हटविताना गाडगेनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी असे ७० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पहाटे ४.४५ वाजता दरम्यान अतिक्रमण हटविताना आरक्षित जागेवरील ती मूर्ती सुध्दा हटविण्यात आली. यावेळी येथील काही रहिवाश्यांनी अतिक्रमण काढताना रोष व्यक्त केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.