परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली येथे विविध विकासकामांच्या निविदा उघडण्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या जाळल्याची घटना घडली. जाळण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्याने त्या फाडल्या आणि या संपूर्ण कृतीचा व्हिडीओ माध्यमावर व्हायरल केला. २६ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली.जाहिरातीच्या अनुषंगाने निविदा ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या. निविदांवर २६ डिसेंबरला ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतचे कर्मचारी आवक, जावक क्रमांक टाकण्याचे काम करीत होते. यादरम्यान एक ग्रामपंचायत सदस्य कार्यालयात दाखल झाले. त्यांनी टेबलवरील या निविदा उचलून बाहेर नेल्या आणि फाडून जाळून टाकल्या. गुरुवारी दुपारी ही घटना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर घडली. ज्या निविदा फाडून जाळल्या. त्यावर २७ डिसेंबरला आयोजित ग्रामपंचायतच्या मासिक सभेत निर्णय होणार होता. या घटनेवर सदस्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.घडलेला प्रकार संतापजनक आहे. विकासकामांबाबत, निविदांबाबत ही अशी दुर्भाग्यपूर्ण भूमिका घेतली जात असेल, तर सरपंच म्हणून काम करायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल.- सुषमा थोरात,सरपंच, कांडलीकांडली ग्रामपंचायतमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती नाही. कुणीही याबाबत कळविलेले नाही.- जयंत बाबरे,गटविकास अधिकारी, अचलपूर
कांडली ग्रामपंचायतमध्ये कामांच्या निविदा जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST
सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली.जाहिरातीच्या अनुषंगाने निविदा ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या.
कांडली ग्रामपंचायतमध्ये कामांच्या निविदा जाळल्या
ठळक मुद्देसदस्याचा प्रताप : व्हिडीओ व्हायरल, गटविकास अधिकारी अनभिज्ञ