शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निविदा ‘मॅनेज’ कंत्राट निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे८३ कोटींची कामे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरली

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणली असून, मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे पितळ त्याअनुषंगाने उघडकीस आले आहे, हे विशेष.मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले ८७ बोगस एअर व्हॉल्व्ह ८३ लाख रुपयांतून बसविण्यात आले आहेत. त्यानंतर मजीप्राच्या अफलातून कारभार समोर आला आहे. ‘अमृत’ अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ मध्ये तब्बल ११४ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा वितरण नलिकांचे कार्य नवीन जलकुंभ निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८३ कोटींच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी अगोदरच नाशिक येथील मयूर व्हॉल्व्ह कंपनी निश्चित करण्यात आली. त्याकरिता मजीप्राने ३० आॅगस्ट २०१६ रोजी व्ही.ई.१६/१७ पीओ-०८ आदेशानुसार जलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल्व्हची तांत्रिक तपासणी केली, असा अहवाल डॉ. अमीन कंट्रोलर्स प्रा.लि. कंपनीने दिला आहे. मात्र, मजीप्राने १० आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीपुरवठा कामांसंदर्भात नाशिक येथील मयूर कंपनीला एअर व्हॉल्व्ह बसविण्याबाबत कार्यारंभ आदेश दिले.खरे तर मजीप्राने ८३ लाख रुपयांतून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असे असताना नाशिक येथील पी.ए. आडके व वैद्य इलेक्ट्रिकल यांना दोन महिन्यांपूर्वीच मजीप्राला एअर व्हॉल्व्ह लागेल, हे कसे माहीत पडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एअर व्हॉल्व्हसंदर्भात त्रयस्थ एजन्सीकडून तपासणी करण्यात आली असता, ही बाब निदर्शनास आली आहे. क्वॉलिटी कंट्रोलची तपासणी ३० आॅगस्ट २०१६, तर पाणीपुरवठा कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे मजीप्राने अगोदर एजन्सी ठरविली, नंतर कामांचे आदेश दिले, हे स्पष्ट होते.व्हॉल्व्हची ही स्थिती; अन्य कामांचे काय?मजीप्राने जुनी जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६०० किमी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नव्याने सहा जलकुंभ, सिंभोरा येथे नवे पंप स्टेशन, तपोवन येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आदी पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यात झालेली गडबड बघता, अन्य कामांमध्येही मोठा घोळ असल्याचा संशय वर्तविला जात आहे.व्हॉल्व्हचे क्वॉलिटी कंट्रोल ३० आॅगस्ट रोजी झाले, तर कामांचे कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरविण्याचा करिश्मा मजीप्राने केला आहे. नाशिक येथील एजन्सीला मजीप्राला अमूक साहित्य लागणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कळले.- सुनील देशमुखआमदार.