शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकमल सिग्नलवर वीसपैकी दहा जणांचा विनामास्क वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

शहर पोलिसांकडून दररोज वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या हॉटेल, खाणावळी, बार, पानटपरी व अन्य प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. १० ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास सिग्नलवरील २० पैकी दहा जण विनामास्क होते, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. दोघांनी दपट्टा गुंडाळलेला होता. मास्क नसणाऱ्या तरुणांसह दूधविक्रेत्याला पोलिसांनी हटकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सुतोवाच केले आहे. राज्यात १२ जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे ४५ रूग्ण आढळून आले आहेत. घाबरून जाण्याची परिस्थिती नसली तरी तो रोखण्यासाठी आजतरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दहाच्या आत आल्याने अनेकांनी मास्कला ‘अलविदा’ केले आहे. जिल्हा प्रशासन डेल्टा प्लसला कसे रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही नाहीशहर पोलिसांकडून दररोज वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या हॉटेल, खाणावळी, बार, पानटपरी व अन्य प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. १० ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास सिग्नलवरील २० पैकी दहा जण विनामास्क होते, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. दोघांनी दपट्टा गुंडाळलेला होता. मास्क नसणाऱ्या तरुणांसह दूधविक्रेत्याला पोलिसांनी हटकले नाही.

पोलिसांचाही मास्क तोंडाखालीच

१) राजकमल चौकात तैनाती असलेल्या वाहतूक पोलिसांनी नीटपणे मास्क घातलेला होता. २) गर्ल्स हायस्कूल चौकात मंगळवारी दुपारी पुरुष व महिला असे दोन वाहतूक पोलीस तैनात होते. त्यातील पुरुष कर्मचाऱ्यांचा मास्क तोंडाखाली होता.३) वाहतूक पोलिसांचा मास्क परस्परांशी बोलताना खाली आला. मात्र, तो नंतर नाकाच्या वर गेला.

पोलीस प्रशासनाद्वारा विनामास्क वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई निरंतर सुरू आहे. याशिवाय महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची पथकेदेखील मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करतात. पोलिसांना पाहताच अनेकांचा हनुवटीवरील मास्क चेहऱ्यावर चढतो. कोरोना संपला, असा गैरसमज असल्याने मास्क वापर कमी झाल्याचे दिसून येते.- प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या