लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत बडनेरा झोनमध्ये झालेल्या वैयक्तिक शौचालयांच्या कामात किमान २.४० लाखांचा घोटाळा झाला आहे. महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही बनावट देयके सादर झाली आहेत. यासाठी जबाबदार असलेल्या ८ ते १० अधिकाºयांची विभागीय चौकशी (डीई) व ज्यांच्यावर दोषारोपण होईल, त्यांची खातेनिहाय चौकशी व या प्रकरणात पोलिसांत आणखी एक तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.महानगरपालिकेच्या बडनेरा झोनमधील वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासंदर्भात ७५ लाखांच्या तीन बनावट नस्तीचा प्रकार आयुक्तांच्या सतर्कतेने उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली.समितीचा अहवाल बुधवारी आयुक्तांना सादर झाला. या अनुषंगाने विचारणा केली असता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हलगर्जी केल्यामुळेच हा प्रकार घडला; यात प्रत्येकांचा काहीना काही दोष असल्याचे आयुक्त म्हणाले.पोर्टलवरील नोंदणी दुर्लक्षितस्वच्छ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे काम करायचे असल्यास संबंधित लाभार्थीची नोंदणी ही पोर्टलवर होत असते. प्रत्येक लाभार्थीचा जिओ टॅग हा पोर्टलवर केला जातो. या कामाचे बिल समोर आल असताना एकाही अधिकाºयाने याविषयीची खातरजमा केली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.बांधकाम किती; क्रॉसचेक नाहीही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच्याकडून दिरंगाई झाल्याने आता विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.फाईलमध्ये खोडतोड, रकमेतही बदलफाईलमध्ये काही ठिकाणी खोडतोड व काही रकमेतही खोडतोड करण्यात आलेली आहे. या बदलाची एकाही अधिकाºयाने दखल घेतली नाही. यामध्ये एकप्रकारची साखळी तर नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.या प्रकरणात सर्वच अधिकाºयांचा निष्काळजीपणा भोवला. यात ‘अप्लिकेशन आॅफ मार्इंड’चा वापरच झालेला नसल्याने स्पष्ट झाले आहे. संबंधितांची विभागीय चौकशी करण्यात येईल.- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका
दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘डीई’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST
ही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच्याकडून दिरंगाई झाल्याने आता विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘डीई’!
ठळक मुद्देवैयक्तिक शौचालय घोटाळा : २.४० कोटींचा ठपका