शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

एका लाखाच्या हातपंपासाठी दहा लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:36 IST

पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील कोहाना येथे उघडकीस आला आहे

ठळक मुद्देशासकीय निधीची ऐसीतैशी : कोहाना गावात हातपंपांना अच्छे दिन

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील कोहाना येथे उघडकीस आला आहेतालुक्यातील कोहना ग्रामपंचायत अंतर्गत नदीकाठी एक हातपंप आहे. गावकरी तेथून पिण्याचे पाणी भरतात. तूर्तास परतवाडा, धारणी या राज्य महामार्गावर पुलाच्या कडेला असलेल्या या हातपंपाला अच्छे दिन आले आहेत. या हातपंपाच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतीने ‘१३ वने’ या निधीतून तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च केला आहे. सौंदर्यीकरणासह संरक्षणावर खर्च केल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. कोहाना येथील आदिवासी गावकरी येथूनच पिण्याचे पाणी भरतात. हा हातपंप नदीकाठी असल्याने तेथे ये-जा करण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे चक्क पेव्हरचा रस्ता हातपंपाला सुरक्षा म्हणून करण्यात आला. त्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला असलेला हा सौंदर्यपूर्ण हातपंप चांगलाच चर्चेत आला आहे . एकीकडे आदिवासींचे उत्थान कागदावर असताना हातपंपाच्या सौंदर्यीकरण चुकीचे आहे.मेळघाटात राहतो की वाळवंटात?उन्हाळ्यात कोहना गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली. मात्र, २००७ मध्ये येथे १५ लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा स्रोत कमी झाल्याने येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु, लगेच पाच लाख रुपये खर्च करून विहिरीचे खोलीकरण करण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च, तर लाख रुपयांच्या हात पंपासाठी दहा लाखांचा खर्च यामुळे कोहाना मेळघाटात की वाळवंटात, असे म्हणायची वेळ आली आहे. मर्जीतले कंत्राटदार लखपती करण्याचा धंदा मेळघाटात सुरू आहे.ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हातपंप संरक्षण भिंत, रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येत आहे.- पी.बी. ठाकरेउपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, धारणीतेरा वने या निधीअंतर्गत दहा लक्ष रुपयांचे हातपंप संरक्षण भिंतीचे काम ई टेंडरद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव घेण्यात आला आहे- नरेंद्र काळे, ग्रामसेवक