शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दहा मिनिटांत आटोपले साडेसात कोटींचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:29 IST

जिल्हानिधी लेखाशीर्ष २५१५-१०१ लोकपयोगी व योजनांतर्गत ७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांची यादी सोमवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दहा मिनिटांत बहुमताने मंजूर करून सभा आटोपती घेण्यात आली. ही सभा १२ वाजता सुरू झाली व २१.१० वाजता अध्यक्षांनी सभागृह सोडले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सभा : पदाधिकाऱ्यांचा बहुमताने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हानिधी लेखाशीर्ष २५१५-१०१ लोकपयोगी व योजनांतर्गत ७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांची यादी सोमवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दहा मिनिटांत बहुमताने मंजूर करून सभा आटोपती घेण्यात आली. ही सभा १२ वाजता सुरू झाली व २१.१० वाजता अध्यक्षांनी सभागृह सोडले.जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात सत्ताधारी पक्षाने २५१५-१०१ या लेखाशिर्षांतर्गत लहान लोकपयोगी कामांचे सुमारे ७ कोटी ३० लाख २० हजार रुपयांचे नियोजन केले आहे. सदर नियोजनात सदस्यांना समन्यायी निधी वाटप झाले नसल्याची तक्रारी झेडपीतील विरोधी पक्षाने विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी आयुक्तांनी सदर नियोजन सीईओ, कॅफो आणि डेप्युटी सीईओंच्या स्वाक्षरीने सभेत मान्यतेसाठी ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अध्यक्षांनी सोमवारी सभा आयोजित केली होती.जिल्हा निधी लेखाशीर्षक २५-१५ लोकपयोगी लहान कामे व योजना मधील सन २०१८-१९ चे नियोजनानुसार विविध विभागांकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे १३ कोटी ६६ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार ५०१ च्या दीडपट कामांचे नियोजन म्हणजेच ७ कोटी ५१ ला रूपयांप्रमाणे जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाने नियोजन केले होते. त्यानुसार सदर विषय ६ आॅक्टोबर व ११ नोव्हेंबरच्या सभेत ठेवला होता. मात्र, लोकोपयोगी लहान कामे यातील नियोजनाची यादी सभागृहात ठेवण्यात आली नाही. याशिवाय सदर यादीवर सीईओ व कॅफोंच्या स्वाक्षºया नव्हत्या आणि समन्यायिक निधीचे वाटप ५९ सदस्यांमध्ये करण्यात आले नाही. अशी तक्रार जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांच्या सदस्या सुहासिनी ढेपे, रवींद्र मुंदे व अन्य सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी कामांची यादी समन्यायी वाटपासह सीईओ, कॅफो यांच्या स्वाक्षरीने सभेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, सुरेश निमकर, शरद मोहोड, अनिता मेश्राम, वासंती मंगरोळे, वंदना करूले, अलका देशमुख प्रभारी सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, माया वानखडे, दिलीप मानकर, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे खाते प्रमुख उपस्थित होते.लोकोपयोगी लहान कामांच्या नियोजनास बहुमताने मंजुरी दिली आहे. यात ५९ सदस्यांना समान न्याय देऊन सर्वांची प्राधान्यक्रमाने कामे आहेत. त्यात कुठलाही अन्याय झाला नाही. त्यामुळे विरोधकांच्या आक्षेपात काही तथ्य नाही.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषदसत्ताधारी पक्षाने लोकोपयोगी कामे साडेसात कोटींच्या मर्यादेत १ ते २४५ क्रमांकापर्यंत करावी. त्यापुढील कामे केल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागू. सदर यादीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना निधीच दिला नाही, हा अन्याय आहे.- रवींद्र मुंदे,विरोधी पक्षनेता जि.प.