अंमलबजावणी : २४ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत कायमअमरावती : एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळी मोसमात भाडेवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने वाढ लागू केली जाणार आहे. यासाठी प्रति सहा किलोमीटरला ६.९५ पैसे अशी वाढ निश्चित झाली आहे. ही वाढ दहा दिवसांसाठी असून, २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यामुळे दिवाळी दरम्यान प्रवाशांना वाढीव भाड्याची खिशाला झळ बसणार आहे.एसटी महामंडळाच्या बसेस तोट्यात सुरू असल्याचे कारण दाखवीत यावर्षी प्रथमच दिवाळी सणात १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू होत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. याचा फायदा घेत एसटी महामंडळाने ही भाडेवाढ ३ ते ५ अशी लागू केली जात आहे. सुटीत प्रवास असून एसटीकडे पाहिले जाते. शिवाय गर्दीच्या काळातही महिलांसाठी बसेस सुरक्षित असल्याने नागरिक बसेसचीच निवड करतात दिवाळीतही शासकीय सुट्या यंदा कमी करण्यात आल्याने थोड्याच दिवसात सर्व कामे नोकरदारांना करावी लागणार आहेत. यामुळे दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात गाडी होणार आहे. याचा आधार घेत एसटीने भाडेवाढ करून कमाई करण्याचे नियोजन केलेले आहे. याला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात करण्यात आली. शेवट १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात जवळपास १०० बसेस विविध मार्गावर धावतात. (प्रतिनिधी)पाच दिवस वाढीव दरलक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सलग येत असल्याने लक्ष्मीपूजन व पाडव्यासाठी २९,३० ला पाडव्यासाठी १ नोव्हेंबर पर्यत ये.जा करण्याचे दिवस आहेत. यामुळे यादरम्यान एसटीचा वापर होणार आहे. याच पाच दिवसांत म्हणजेच २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर असे सलग पाच दिवस वाढीव दर तयार केलेले आहेत.असे राहणार मुदतनिहाय दरवाढ२५ ते २७ आॅक्टोंबर जुन्या दराप्रमाणे२८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर -नवीन३ ते ४ नोव्हेंबर-जुने५ ते ९ नोव्हेंबर नवीन९ ते ११ नोव्हेंबर जुने १२ ते १४ नोव्हेंबत नवीन दर राहतील
दहा दिवस एसटीची ६.९५ पैशांनी भाडेवाढ
By admin | Updated: October 29, 2016 00:27 IST