शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत १० दिवसात ३६६ विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

अमरावती : शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दहा दिवसात जिल्हाभरात ३६६ विद्यार्थ्यांचे ...

अमरावती : शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दहा दिवसात जिल्हाभरात ३६६ विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित झाले आहेत, तर १० विद्यार्थ्यांचेच प्रवेश अंतिम करण्यात आले आहेत.

मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने आरटीई अंतर्गत खासगी शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ याकरिता प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर सुरू झाली होती. जिल्ह्यातील २,३४४ शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी २,०७६ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ५,९१८ अर्ज प्राप्त झाले होते. एप्रिलमध्ये सोडत काढल्यानंतर जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले त्यांच्या पालकांना मोबाईलवर प्रवेशाचा एसएमएस प्राप्त झाला होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवेश प्रक्रियेला ब्रेक लागला होता. कोरोनामुळे रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला गत १० दिवसापासून सुरू झाली आहे. यात आरटीईचे ३६६ तात्पुरते, १० जणांचे अंतिम प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये, निवड यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

बॉक्स

३० जूनची डेडलाईन

आरटीई प्रवेशासाठीची सोडत गत ७ एप्रिल रोजी राज्यस्तरावर काढण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १९८० विद्यार्थ्यांची सोडतीत प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यानंतर आरटीई अंतर्गत ११ जूनपासून प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड यादीतील प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने ३० जूनची डेडलाईन देण्यात आली आहे. या कालावधीत निवडपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे आवश्यक आहे.