शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत ना.ठाकूर यांच्यासमोर दोन स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरण केले.शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसनाच्या दृष्टीने दत्तक विधानप्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न 'व्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन' ही स्वयंसेवी संस्था करत आहे. याबाबत ना. ठाकूर यांनी आढावा घेत संस्थेचे प्रयत्न, प्रक्रिया, सॉफ्टवेअरची माहिती घेतली. मूल दत्तक घेण्यास पालक उत्सुक असतात.

ठळक मुद्देना. यशोमती ठाकूर यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या बालगृहातील मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.  सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत ना.ठाकूर यांच्यासमोर दोन स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरण केले.शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसनाच्या दृष्टीने दत्तक विधानप्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न 'व्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन' ही स्वयंसेवी संस्था करत आहे. याबाबत ना. ठाकूर यांनी आढावा घेत संस्थेचे प्रयत्न, प्रक्रिया, सॉफ्टवेअरची माहिती घेतली. मूल दत्तक घेण्यास पालक उत्सुक असतात. मात्र त्यांची फसवणूक होऊ नये, अवैधरित्या दत्तक देण्याचे प्रकार होऊ नये. दत्तकची प्रक्रिया सहज, सुलभ होणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असे संस्थेच्या चित्रा बुझरुख यांनी सांगितले.          ‘आंगण’ या संस्थेने बालगृहातील मुलांच्या देखरेखीसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अँड्रॉईड ॲप विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता धर्माणे यांनी सांगितले, बालन्याय कायद्यानुसार शासकीय, स्वयंसेवी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या बालगृहांची निरीक्षण समितीमार्फत वर्षभरात चार वेळा तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी ॲपचा वापर करता येऊ शकतो. ॲपमुळे ही माहिती तातडीने शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याचे तपशील, शैक्षणिक प्रगतीबाबत अद्ययावत माहिती सादर झाल्याने आवश्यक मदत देणे, नवे उपक्रम राबवणे सुलभ होईल. राज्यात सध्या ४५० बालगृह असून ॲपमुळे कागदोपत्री होणारी प्रक्रिया जलद होऊ शकेल.    याबाबत बोलताना  ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या, दत्तक प्रक्रिया सोपी, सुलभ करणे तसेच जी बालके बालगृहात आहेत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देणे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे कौतुकास्पद आहे. अशा डिजीटल प्रयत्नामुळे किचकट काम सोपे आणि पेपरलेस होईल. याबाबत स्वयंसेवी संस्थांना शासन स्तरावरुन आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर