शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना तंत्रज्ञानाचे धडे

By admin | Updated: February 6, 2017 00:09 IST

फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा...

सामाजिक उपक्रम : ढाकुलगावात ई-लर्निंग वर्गखोलीधामणगाव रेल्वे : फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग आजच्या संगणक युगात सामाजिक उपक्रमातून एचपीसीएलने राबवायला सुरूवात केली आहे. ढाकुलगावात चिमुकल्यांना ई-लर्निंग वर्गखोलीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत़ धामणगाव गॅस अ‍ॅण्ड डोमॅस्टिकच्यावतीने तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येते. तालुक्यातील चिमुकल्यांना बदलत्या शिक्षण प्रवाहात अधिक गती मिळण्याकरिता ढाकुलगाव हे गाव शैक्षणिक दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे़ हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि़ गॅस भराई संयंत्र खापरी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने येथील जि़प़पूर्व माध्यमिक शाळेत ई-लर्निंग वर्ग खोली उभारली आहे़ चिमुकल्यांनी स्वच्छतेचा मंत्र अंगीकारावा म्हणून हँडवॉश केंद्र, मुलामुलींसाठी प्रसाधन गृहाची निर्मिती करण्यात आली आहे़या उपक्रमाला हातभार लावणारे एचपीसीएलचे वरिष्ठ क्षत्रिय प्रबंधक महेश राम यांच्या हस्ते ई-लर्निंग खोलीचे लोकार्पण करण्यात आले़ यावेळी प़ंस़सभापती गणेश राजनकर, सयंत्र प्रबंधक विनोद साळुंके, उपप्रबंधक परिचालान अधिकारी प्रफुल्ल मानकर, अश्विन डोंगरे, लोकेश सक्सेना, धामणगाव गॅस अ‍ॅण्ड डोमॅस्टिकचे संचालक अशोक भंसाली, प़ंस़सदस्य सचिन पाटील, निखिल भंसाली, सरपंच विजय कांडलकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप माकोडे, केंद्रप्रमुख मुरलीधर नारे, विषयतज्ज्ञ शेषराव चव्हाण यांची उपस्थिती होती़ ग्रामीण विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळावे म्हणून एचपीसीएलने सामाजिक उपक्रमात एक पाऊल पुढे टाकल्याने येथील शाळा व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले़ ई-लर्निग प्रक्रियेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची बैद्धिक पातळी वाढायला मदत होईल, असे मत अशोक भंसाली यांनी व्यक्त केले़संचालन मुख्याध्यापक अरविंद नाहे, तर प्रास्तावीक आश्विन डोंगरे व आभार प्रदर्शन भाष्कर पिंपळे यांनी केले़ कार्यक्रमाकरीता निखिल भंसाली, राजू वंजारी, सहायक शिक्षिका सारिका सुपले, बाली चुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले़ (तालुका प्रतिनिधी)