शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘माइंड लॉजिक ’च्या तंत्रज्ञांची झाडाझडती

By admin | Updated: May 13, 2017 00:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी जबाबदारी सोपविलेल्या ....

कुलगुरुंनी फटकारले : प्रकरण आॅनलाईन परीक्षा निकाल लांबणीचे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी जबाबदारी सोपविलेल्या बंगळूरु येथील माइंड लॉजिक ही एजन्सी कुचकामी ठरल्याप्रकरणी कुलगुरुंनी या कंपनीच्या तंत्रज्ञांची शुक्रवारी झाडाझडती घेतली. येत्या सत्रातील परीक्षांचा निकाल वेळेपूर्वी लावल्याबाबत कानउघाडणी केल्याची माहिती आहे.कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते, लेखा व वित्त अधिकारी शशीकांत आस्वले, माइंड लॉजिक कंपनीचे संचालक जीतेन, तंत्रज्ञ श्रीजीत आदी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरु चांदेकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागल्याप्रकरणी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आॅनलाईन निकाल वेळेपूर्वी लागणे अपेक्षित असताना केवळ माइंड लॉजिकच्या गलथान कारभारामुळे विद्यापीठावर नामुष्की ओढवल्याची बाब कुलगुरुं नी बैठकीत व्यक्त केली. विद्यापीठाने प्रायोगिक तत्त्वावर अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमांचे निकाल आॅनलाईन लावण्याचे ठरविले. मात्र एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे ते शक्य झाले नाही, याविषयावर चिंतन करण्यात आले. करारानुसार एजन्सीने वेळेपूर्वीच निकाल लावणे अनिवार्य असताना ते पूर्ण केले नाही, ही बाब विद्यापीठ कायद्याला छेद देणारी ठरली. त्यामुळे कंपनीकडे विद्यार्थ्यांचा असलेला डेटा अगोदर सुरक्षितपणे विद्यापीठाला परत करावा, असे या बैठकीत निश्चित झाले. उन्हाळी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात माइंड लॉजिक एजन्सी आता कुचकामी ठरली तर गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाईल, अशी ताकीदही दिली.विधी अभ्यासक्रमाचा ‘क्रॉईम’ या विषयाचा पेपर व्हॉट्अपवर तासभरापूर्वी पाठविल्याप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात चमू पोहोचली आहे. यात वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- जयंत वडते, संचालक, परीक्षा मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ