शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘टेक्निकल आॅडिट’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:05 IST

राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देत्रयस्थ यंत्रणेशी सहकार्य अनियमितता टाळण्यासाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. या संस्थांकडून करण्यात येणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत व त्यामधून टिकाऊ मत्ता निर्माण व्हाव्यात, यासाठी या कामांच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेकडून अधिक प्रभावी व परिणामकारक तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी सरकारने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.विकासकामांचे त्रयस्थ लेखापरीक्षण दोन टप्प्यांमध्ये करण्यात यावे, अशा सूचना नगरविकास मंत्रालयाने महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. पहिल्या टप्प्यातील त्रयस्थ लेखापरीक्षण नगरविकास विभागाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या सर्वच कामांसाठी करण्यात येईल. त्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांना नामिकासूचीवर घेण्यात आले आहे. यात कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कऱ्हाड, औरंगाबाद, जळगाव व अमरावतीचा समावेश आहे. याशिवाय नांदेडचे गुरू गोविंदसिंग इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सरदार पटेल कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अंधेरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोणेरे व वालचंद कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग सांगलीचा समावेश आहे. याशिवाय नागपूर, गडचिरोली, आर्वी, चंद्रपूर, साकोली, यवतमाळ, वाशिम, नांदेड, लातूर, औरंगाबाद, बीड, जळगाव, धुळे, नाशिक, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, कऱ्हाड, बांद्रा, ठाणे व रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे.

तक्रार असेल तर...दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक लेखापरीक्षणाचे आदेश डीएमए स्तरावरून दिले जातील. ज्यांचे अगोदर लेखापरीक्षण झाले आहे, मात्र त्याबाबत तक्रार असेल, ते आयआयटी मुंबई, व्हीजेआयटी मुंबई व व्हीएनआयटी नागपूरकडूनच करता येईल. त्यासाठी या तिन्ही संस्थांना नामिकासूचीवर घेण्यात आले आहे.

या कामांचे होईल तांत्रिक लेखापरीक्षणरस्ते अनुदान, विशेष रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नवीन नगरपंचायती/नगर परिषदांना अनुदान, नगर परिषद व महापालिका हद्दवाढ, महापालिका पायाभूत सुविधा अनुदान, याशिवाय नगरविकास विभागाकडून निधी वितरित करण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे.

टॅग्स :Governmentसरकार