शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:05 IST

आॅनलाईन लोकमतधारणी : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी १५ मार्चपासून जि.प. शाळा सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्याचे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले. त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने सकाळी ७ ते १० पर्यंत विविध शाळांना भेटी दिले असता, बहुतांश शाळेत शिक्षकच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून जि.प. शाळेतील शिक्षकांची मनमानी ...

ठळक मुद्देमेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा : सकाळच्या शाळेला शिक्षकांची अनुपस्थिती चिंताजनक

आॅनलाईन लोकमतधारणी : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी १५ मार्चपासून जि.प. शाळा सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्याचे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले. त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने सकाळी ७ ते १० पर्यंत विविध शाळांना भेटी दिले असता, बहुतांश शाळेत शिक्षकच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून जि.प. शाळेतील शिक्षकांची मनमानी सुरू असल्याचे दिसून येते.जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिलेल्या पत्राची प्रत शिक्षकांच्या मोबाइलवर पोहोचली. मात्र, धारणी पं.स. अंतर्गत काम करणारे बहुतांश शिक्षक शनिवारी गावी जाऊन सोमवारी दुपारपर्यंत परत आले. असे शिक्षक तालुक्यात ५० टक्क््यांपेक्षा अधिक आहेत. अशा शिक्षकांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकाकडून वेळेची विशेष सूट दिली जाते. परिणामी रविवारी व सोमवारी शिक्षकांची पटसंख्या कमी असते. मात्र, हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या आढळून येतात.त्यामुळे अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडल्याचे दिसून आले.येथे शिक्षक हजरघुटी येथील शाळेने आश्चर्याचा धक्काच दिला. येथे सर्व शिक्षक ७.५० वाजता हजर दिसले. त्यांनी मॅसेजमध्ये घोळ होत असल्याची तक्रार केली. धाराकोट व आकी शाळेत सर्व शिक्षक वेळेवर पोहोचले होते तसेच तर प्रार्थना होऊन वर्ग सुरू झाले होते.गटशिक्षणाधिकाऱ्यांचा 'नो रिस्पॉन्स'या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ४ ते ५ वेळा गटशिक्षणाधिकारी यांच्या मोबाइलवर संपर्क केला. पूर्ण रिंग जाऊनही फोन उचलला गेला नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.आज सकाळी ७ वाजता कुसुमकोट बुजुर्ग येथे शाळेला भेट दिली असता अवघे २-४ विद्यार्थी दिसून आले. मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षिका आढळून आल्या. इतर शिक्षक बेपत्ता होते. लगेच ७.१० वाजता शिरपूर येथील शाळेला भेट दिली असता दोन शिक्षिका व एक शिक्षक उपस्थित होते. इतर शिक्षक उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले.टिटंबा शाळा उघडलीच नाहीसर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली टिटंबा ही केंद्रशाळा सकाळी ८.१० वाजता बंद होती. दोन-चार विद्यार्थी तेथे फिरत होते, कार्यालयासह संपूर्ण वर्गखोल्यांना कुलूप लागले होते. एकही शिक्षक ८.३० पर्यंत उपस्थित झाले नव्हते. तत्पूर्वी, राणी तंबोली येथील शाळेत ७.३० वाजता विद्यार्थिनी फलकावर सुविचार लिहित होत्या. केवळ १० विद्यार्थी उपस्थित होते, तर एकही शिक्षक शाळेत पोहोचले नव्हते. मांडू येथील शाळेला ७.४० वाजता भेट दिली असता, तीन शिक्षक हजर, तर मुख्याध्यापकासह दोन शिक्षक रजेवर होते.