शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक महासंघाने थाटले रिकाम्या पोत्यांचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:15 IST

शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला.

ठळक मुद्देधोरणांचा निषेध : आदेश रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला.शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याने शिक्षक महासंघाद्वारा हे अफलातून आंदोलन करण्यात आले. मात्र, एकही ग्राहक न फिरकल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकानी शासनाने हा उपक्रम सुरू करावा, अशी उपरोधिक टीका भोयर यांनी केली. रिकाम्या पोत्यासंदर्भात आजपर्यंत शिक्षकांनी आदेश नसल्यामुळे या पोत्यांचा वापर शालेय बांधकामसह इतर प्रयोजनार्थ वापरली. यामधील बहुतांश पोते उंदरांनी कुरतडले. साठवणीसाठी जागा नसल्यानेही या पोत्यांचा मागील सहा वर्षांचा हिशोब देणे अशक्य बाब असल्याचे शेखर भोयर यांनी सांगितले.शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकारअध्ययन व अध्यापन हे शिक्षकांचे कार्य आहे. मात्र, शासन वेगवेगळे आदेश काढून शिक्षकांना वेठीस धरत आहे व त्यांच्या मूळ कार्यापासून परावृत्त केले जात आहे.गुणवत्तेचा उदोउदो करणाऱ्या शासनाने गुणवत्तेवरच आघात करणे सुरू केले आहे. हा शिक्षकांच्या दृष्टीने घातक निर्णय असल्याने शासनाने तातडीने हा शासनादेश रद्द करावा, अशी मागणी शेखर भोयर यांनी केली.