शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शिक्षक ‘पोलचिट’ वाटपात, विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: October 12, 2014 23:29 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ २ दिवस उरले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रचाराचे घमासान अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रत्येक मतदाराच्या

गजानन मोहोड - अमरावतीविधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ २ दिवस उरले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रचाराचे घमासान अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रत्येक मतदाराच्या हातात मतदारचिठ्ठी देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शाळेत दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान १५ आॅक्टोबरला होत आहे तत्पूर्वी १४ आौक्टोबरपर्यंत प्रत्येक मतदाराचे हातात मतदारचिठ्ठी पोहचण्याची जबाबदारी मतदान केंद्र प्रमुखावर (बीएलओ) आहे. शिक्षकांसोबत विविध शासकीय यंत्रणातील कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत दोन वेळा प्रशिक्षण वर्ग देखील झाले आहे. काही शिक्षकांना मतदान केंद्र प्रमुख ठेवण्यात आले आहे. निवडणूक विभागाने तयार केलेल्या मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. निवडणूक यंत्रणेत सहभाग हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असला तरी नियोजनाअभावी शाळेकडे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थी रामभरोसे आहेत. लहान गावात काही तासांत मतदारचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र मोठ्या शहरांमध्ये हे काम आठ दिवसांपासून सुरू असल्यामुळे विद्यार्थी रामभरोसे आहेत. शिक्षकांच्याही आहेत व्यथामतदारचिठ्ठीचे वाटप करीत असताना मतदारांचे स्थलांतर, भाड्याचे बदललेले घर, पत्त्यात बदल झाला असल्यास त्याची नोंद घ्यावी लागते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या मतदान केंद्रावरील शिक्षकांना नोटीशी बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या कामाचे मानधन कित्येकांना अद्यापही मिळालेले नाहीत.