शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथवर बनायचा चहा, वडे अन्‌ कांदाभजी; टपऱ्या उखडून फेकल्या!

By प्रदीप भाकरे | Updated: July 19, 2024 17:06 IST

Amravati : कोर्ट, जिल्हा परिषद परिसराने मोकळा श्वास घेतला, महापालिका उपायुक्तांचा दणका

प्रदीप भाकरेअमरावती : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा न्यायालय व जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर चहा टपरी व नाश्त्याच्या गाडींचे अनिर्बंध अतिक्रमण झाले होते. तेथील फुटपाथ अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतला होता. जिल्हा परिषदेच्या दोनही प्रवेशद्वारांलगत लागलेल्या टपरींवर चहा पिणारे व नाश्ता करणाऱ्या लोकांची गर्दी थेट रस्त्यावर येत असल्याने तेथे काही घटना तर घडली नसावी ना, अशी शंका घेण्याइतपत तेथे गर्दी होत होती. त्या अतिक्रमणांवर गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दमदार कारवाई केली. तेथील अतिक्रमण दूर सारण्याचे निर्देश महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिले होते.              

काही दिवसांपासून तेथील फुटपाथवरच खाद्यपदार्थ बनवून ते तेथेच विकले जात होते. फुटपाथ गायब झाला होता. ती बाब लक्षात आल्यानंतर उपायुक्त माधुरी मडावी यांनी तेथील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश पथकाला दिले. त्यानुसार अतिक्रमण पथकप्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, निरीक्षक अनसार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट परिसर व जिल्हा परिषद ऑफिससमोरील अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. तसेच यापुढे अतिक्रमण करून हातगाडी वा फुटपाथ गिळंकृत न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारादेखील देण्यात आला.

नाल्यांवरील अतिक्रमण काढलेसोबतच, शहरातील विविध मोठे व छोटे नाले व प्रभागातील नालीवर बांधकाम केलेले अतिक्रमित रपटे व अन्य बांधकाम देखील काढून टाकण्यात आले. अंबादेवी परिसरातील एका दुकानदाराने रोड साइडला अतिक्रमण केले असून, त्या दुकानदारांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. सोबतच, शहराच्या विविध भागांत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती