शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीत पुन्हा घाण कपात चहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:07 IST

अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत.

आजाराला आमंत्रण : अतिशय घाण पाण्यात धुतले जातात कपसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत. त्याच अस्वच्छ कपात ग्राहकांना चहा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये दूषित व घाण जागेवरील अन्नपदार्थ प्राशन केल्याने किंवा घाण पाण्यात धुतलेल्या कापातच वारंवार चहा पिल्यानेही पोटाचे व इतर आजार वाढतात. अंबानगरीत काही हॉटेल्समध्ये अतिक्रमण करुन व हातगाड्यांवरील चहाच्या टपऱ्यांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कायद्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचालकांवर किंवा अन्नपदार्थांची जर अशाप्रकारे विक्री होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीएची आहे. परंतु, अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे वाटेल तशा गलथान सुविधा नागरिकांना पुरविल्या जातात. अन्नपदार्थांचे दामदुप्पट पैसे घेतल्यानंतरही मात्र त्यांना सुविधा पुरविली जात नाही. अंबानगरीत सात ते १० रुपये कट याप्रमाणे चहाची विक्री करण्यात येते. पण अनेक हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी वारंवार घाण पाणीच वापरले जातात. कप धुतल्यानंतर तासन्तास हे पाणी बदलले जात नाही. ग्र्राहकांच्या डोळ्यासमोर त्याच घाण पाण्यातून हे कप काढली जातात व त्यामध्ये चहा टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात घाण पाणी त्या चहासोबत आपल्या पोटात जाते. दरदिवसाला अनेक लोकांचे तोंड या कपांना लागते, त्यामुळे कप स्वच्छ पाण्याने धुवून निर्जंतुक करून वापरणे गरजेचे असते. परंतु असे न होता घाण पाण्यातच हे कप धुवून ग्राहकांना या कपांमध्ये चहा दिल्या जातो. अनेक हॉटेल चालकांने कप धुण्याचे पाणी घाण झाल्यानंतर पाणी त्वरित बदलले पाहिजे. एका टबात कप धुतल्यानंतरसुध्दा बाजूला दुसरा टब असला पाहिजे. हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन असले पाहिजे. या सर्व बाबी जर नसेल तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार तपासला पाहिजे. जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यांना सुधारणा नोटीस दिली पाहिजे. जर वारवांर हा प्रकार घडत असेल तर त्या हॉटेल चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्या अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.