शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव सभागृहात फेटाळला

By admin | Updated: August 18, 2015 00:12 IST

अतिरिक्त आणि नवीन बांधकामावर कर आकारणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ठरविलेल्या करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळून लावला

सहापट नव्हे दुप्पट वसूल होणार : जुलै महिन्याच्या ठरावावर सदस्य कायमअमरावती : अतिरिक्त आणि नवीन बांधकामावर कर आकारणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ठरविलेल्या करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच सहापट नव्हे तर दुप्पट कर आकारणी करण्याचा निर्णय महापौर चरणजित कौर नंदा यांनी सोमवारी घेतला. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली सर्वसाधारण सभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात भाग घेतला. दरम्यान आयुक्तांकडून आलेल्या प्रशासकीय विषय क्रमांक ७० अन्वये महापालिका क्षेत्रातील नवीन आणि अतिरिक्त बांधकामाचे सर्वेक्षण करुन मालमत्ताकराच्या आकारणीबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीच्या प्रस्तावासंदर्भात २० जुलै रोजी सभेने पारित के लेल्या ठराव क्र. १२६, १२८, १२९ नुसार करवाढीबाबत आयुक्तांनी बांधकामाच्या चौरस फुटानुसार ठरविलेल्या धोरणावर सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या महिन्यात २० जुलै रोजी नवीन व अतिरिक्त बांधकामावर दुप्पट कर आकारणीचा निर्णय सभागृहाने घेतला असताना तो नव्याने सभागृहात आणण्याचे कारण काय, असा सवाल विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, दिगंबर डहाके, तुषार भारतीय, प्रकाश बनसोड, प्रशांत वानखडे, विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, प्रदीप बाजड, बाळासाहेब भुयार, मिलिंद बांबल, संजय अग्रवाल, प्रदीप दंदे, अजय गोंडाणे, विजय नागपुरे, अंबादास जावरे आदींनी उपस्थित केला.सर्वच घरांची तपासणी होणार- आयुक्ततुषार भारतीय, दिगंबर डहाके यांनी आता घरमोजणी मोहीम का थांबली? सामान्यांनाच वेठीस धरणार काय? आमदार, खासदारांची घरे मोजणीतून मुक्त करणार काय? अशा प्रश्नांची सरबत्ती केली असता आयुक्त गुडेवार यांनी सर्वच घरांची मोजणी करणार. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली जात असून कोणतेही घर मोजणीतून सुटणार नाही, असे उत्तर दिले. दादासाहेब गवर्इंचे तैलचित्र लागणारमाजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांना सोमवारी सभेच्या प्रारंभीच श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी विलास इंगोले यांनी दादासाहेब गवई यांचे तैलचित्र स्थानिक नेहरु मैदान येथील शहीद स्मारकाच्या हॉलमध्ये लावण्याचा प्रस्ताव मांडला. शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्याचेही आवर्जून नमूद केले. या प्रस्तावाला दिगंबर डहाके, अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे, अजय गोंडाणे, राजेंद्र तायडे, कांचन गे्रसपुंजे, विजय नागपुरे, दीपमाला मोहोड आदींनी अनुमोदन केले. महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला.गढूळ पाण्याचा विषय तापलाजीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा महापालिकेच्या आमसभेत चर्चिल्या गेला. पाणी शुध्दीकरण होत नसल्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री आणि भेसळीबाबत प्रदीप बाजड यांनी भूमिका मांडली. पाणी नमुन्यांच्या तपासणीवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मजिप्राच्या श्वेता बॅनर्जी यांनी मात्र जलशुध्दीकरण होत असल्याचे सांगितले. पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दिगंबर डहाके यांनी ‘ट्री गार्ड’चा विषय मांडला. हा मुद्दा आठवडाभरात, निकाली काढला जाईल, असे सांगितले.