शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

५२ ग्रामपंचायतींत बुडतो बीएसएनएल टॉवरचा कर

By admin | Updated: July 19, 2015 00:25 IST

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८४३ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ११३ ग्रामपंचायत हद्दीत बीएसएनएलचे टॉवर आहेत.

उदासीनता : कराची आकारणी करण्यात कुचराईजितेंद्र दखणे अमरावतीजिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८४३ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ११३ ग्रामपंचायत हद्दीत बीएसएनएलचे टॉवर आहेत. यापैकी ५२ ग्रामपंचायतींनी या टॉवरवर कर आकारणी लागू केली नाही. परिणामी या हजारो रूपयांचा कर नाहक बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सुमारे ११३ गावांत भारत संचार निगमने आपल्या मालकीचे टॉवर उभारले आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यात ६, वरूड १०, अमरावती ७, चांदूर बाजारमध्ये ११, अचलपूर तालुक्यात ८, चांदूररेल्वे ७, नांदगाव खंडेश्र्वर ११, भातकुली ९, धारणी २, अंजनगाव सुर्जी ९, धामनगाव रेल्वे १४, चिखलदरा १, दर्यापूर ५, आणि मोर्शी ९ याप्रमाणे बीएसएनएल टॉवर काही गावांमध्ये उभारले आहेत. यापैकी निवडकच ग्रामपंचायतींनी या टॉवरवर कर आकारणी केली आहे. यामध्ये केवळ ५५ ग्रामपंचायतींनीच भारत संचार निगमकडून कर आकारणीची रक्कम वसुलीसाठीची कारवाई ग्रामपंचायतींनी केली आहे. मात्र यापैकी २४ टॉवरचाच कर भरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. उर्वरित ग्रा.पं.च्या हद्दीतील कर वसूल केलाच जात नाही. बीएसएनएल कंपनीसुध्दा हा कर भरत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने या प्रकारावर पडदा पाडला जात आहे.या गावांत कर आकारणीच नाहीतिवसा - वऱ्हा, कौंडण्यपूर, मार्डी, गुरूदेवनगर, शिवणगाव व वरूडमधील बेनोडा, ढगा, गाडेगाव, जरूड, लोणी, बारगाव, राजुरा बाजार, टेभुरखेडा, मांगरूळी, अमरावती -नांदगाव पेठ, मलकापूर, चांदूरबाजार -धानोरा, ब्राम्हणवाडा, घाटलाडकी, सोनोरी, मासोद, शिरजगाव बंड, जवळा, शिरजगाव कसबा, करजगाव, बेलोरा, अचलपूर मधील रासेगाव, काकडा, धामनगाव गढी, परसापूर, पथ्रोट, बोपापूर, खैरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, नांदगाव खंडेश्र्वरमधील दहिगाव, शेलुगुंड, नांदगाव, शिवरा, मांजरी म्हसला, भातकुली तालुक्यातील गणोजा देवी, खोलापूर, वाठोडा शुकलेश्र्वर, खारतळेगाव, साऊर, आसरा,अंजनगाव सुर्जी मधील कापुसतळणी, धामनमाव रेल्वे मधील जुना धामनगांव , मलातपूर,निभोंरा बोळखा, तळेगाव दशासर, वसाड, मोर्शी खेड, हिवरखेड,निंभा, रिध्दपूर, अंबाडा, राजूरवाडी, अडगाव या गावांचा समावेश आहे.ज्या ग्रामपंचयात क्षेत्रात बिएसएनएल चे टॉवर आहेत मात्र त्यावर ग्रामपंचायतीनी कर आकारणी केली नसेल अशा सर्व ग्रामपंचायतींना शासनाच्या नवीन कर आकारणी धोरणानुसार कर आकारला जाईल.-जे.एन आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग.