शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

करवसुली पूर्ण; सेवा का अपूर्ण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर कुºहाड मारून घेतली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. समन्वय नाही. स्वच्छता कंत्राटदार कुणालाच जुमानत नाही. सर्वच प्रभागात आता बकाल अवस्था झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दैनंदिन सफाईच्या अनुषंगाने महापालिकेत प्रभागनिहाय कंत्राट असले तरी यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. अनेक प्रभागांत चार दिवसांआड कचरा संकलन होत आहे. त्यामुळे करवसुलीसाठी बडगा उगारत असताना सेवा का अपूर्ण दिली जात आहे, असा आठ लाख अमरावतीकरांचा सवाल आहे.शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. समन्वय नाही. स्वच्छता कंत्राटदार कुणालाच जुमानत नाही. सर्वच प्रभागात आता बकाल अवस्था झालेली आहे. कंत्राटदारां-बाबत तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. यामुळे ते कुणालाच जुमानत नाहीत. कुठलाही प्रभाग घ्या, सर्वाधिक तक्रारी स्वच्छतेबाबत होतात अन् महिन्याकाठी कोट्यवधीची सर्वाधिक बिले या कंत्राटाची आहेत. महापालिकेचे अधिकारी अन् कर्मचारी कंत्राटदारांचे बटिक आहेत का, असा नागरिकांचा सवाल आहे.अर्जुननगर प्रभागात चार दिवासांआड कचरा संकलन केले जाते. नाल्यांची सफाई नियमित होत नाही. कचरा संकलन करणाºया वाहनांसोबत मदतनीस राहत नाही. कित्येक महिने धूर फवारणी होत नाही. खुल्या प्लॉटमध्ये जंगल झाले. टक्केवारीत सर्वाधिक कराचा भरणा करणारा प्रभाग असताना आम्हाला सेवा का अपूर्ण, असा येथील नागरिकांचा सवाल आहे.स्वच्छता कंत्राटदारविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यामागे नगरसेवकाचे काय गुपित आहे, असा सवाल येथील नागरिकांचा आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तदेखील या तक्रारी बेदखल का करतात, त्यांच्या अधिनस्थ असलेली यंत्रणा करते तरी काय, दैनंदिन हजेरीच्या वेळी उपस्थित राहणारे पदाधिकारी नंतर गपगार का राहतात, हा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.प्रभागातील सर्व रस्ते, लहान-मोठ्या कच्च्या-पक्क््या नाल्या, सर्व्हिस गल्ली, सार्वजनिक शौचालये, मुताºया, कल्व्हर्ट रोड, क्रॉस ड्रेन साफ करणे, नालीवरील, रोड डिव्हायडरवरील गवत काढणे, फुटपाथवरील कचरा व घाण काढून कंटेनरमध्ये टाकणे, डास निर्मूलन मोहीम राबविणे, प्रभागात फवारणी धुवारणीची कामे अगत्याची आहेत. तथापि, कित्येक ठिकाणी या कामांना हातच लागलेला नसल्याचे वास्तव आहे.राज्यात राहणीमानाबाबत ‘टॉप टेन’मध्ये गणले जाणारे अमरावती शहर स्वच्छता मानांकनात का माघारते, हे या बाबी स्पष्ट करीत आहेत.दुर्लक्षित ठिकाणी ऑफिसनागरिकांच्या तक्रारींसह कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटदारास प्रभागातील कार्यालय (ऑफिस) २४ तास उघडे ठेवावे लागते. त्यात संगणक, तीन कामगारांची व्यवस्था आणि टोल फ्री क्रमांक अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात हे कार्यालय अशा दुर्लक्षित भागात असते की, कुणाही नागरिकाला पत्ता सापडणार नाही. अशीच अवस्था बहुतांश प्रभागांमध्ये आहे. प्रतिदिन हजार रुपये दंडाची तरतूद असताना महापालिकेने एकदाही याप्रकरणी कारवार्ई केली नसल्याचे वास्तव आहे.बायोमेट्रिक हजेरी का नाही?स्वच्छतेसाठी कंत्राटदाराने ५५ कामगार कर्तव्यावर ठेवणे अनिवार्य आहे. किती ठिकाणी हे कामगार आहेत, यांच्या हजेरीच्या वेळी उपस्थित असणारे काही नगरसेवक याविषयीचा आवाज का उठवित नाहीत, या कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असताना व करारनाम्यात तशी तरतूद असताना महापालिका प्रशासन त्यात सूट का देते, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यावेळी असतात तरी कोठे आदी एक ना अनेक सवाल या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.दंडाची आकारणी कधी करणार?प्रत्येक मिनी टिप्परमध्ये नोटबूक अनिवार्य आहे. ज्या भागात कचरा संकलन केले, त्या भागातील २५ ते ३० नागरिकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. मात्र, कचरा संकलनासाठी वाहनच चौथ्या दिवशी येत असेल, तर दररोज स्वाक्षऱ्या येणार कोठून? याबाबत स्वच्छता विभाग कधी पाहणी तरी करतो काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नियमांची पूर्तता कधीच केली जात नसताना या कामांची कोटींची बिले निघतात तरी कशी, याची पदाधिकारी कधी विचारणा करणार आहेत काय, अशा नागरिकांचा सवाल आहे.वाहनावरील मदतनीस गायबवाहनाबाबतच्या अटी व शर्तीनुसार मिनी टिप्परद्वारे घराघरांतून दैनंदिन कचºयाचे संकलन करताना प्रत्येक वाहनात एक मदतनीस अत्यावश्यक आहे व त्याने ओला व सुका कचरा वेगवेगळा करून टाकावयास पाहिजे. प्रत्येक वाहनावरील चालक व मदतनीस यांच्याजवळ स्मार्ट फोन आवश्यक आहे. त्याने प्रत्येक घरातून कचरा गोळा करतानाचा जीपीएस फोटो घेणे महत्त्वाचे असताना कुठेही सफाई होताना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा नागरिकांचा सवाल आहे.

टॅग्स :Taxकर