शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा येथे उपविभागीय कार्यालय खेचून आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:22 IST

राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी तिवसा व कुºहा येथे जाहीर सभेत केला.

ठळक मुद्देनवनीत रवि राणा यांचा संकल्प : सुनील शेट्टी यांची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी तिवसा व कुºहा येथे जाहीर सभेत केला. यावेळी अभिनेता सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासाठी परिसरातील युवक, महिला, असंख्य नागरिकांनी एकच गर्दी केली होती.मंचावर रिपाइं (गवई गट) राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव नावखडे, संपर्कप्रमुख जितू दुधाने, नितीन मोहोड, हरिभाऊ मोहोड, एजाज पटेल, फिरोज शाह, माजी सभापती दिलीप काळबांडे, महादेव गारपवार, डॉ. तंवर, धीरज केने, संदेश मेश्राम, काळे, निंदाने, पप्पू देशमुख, सय्यद जहांगीर, संदीप आमले, मुकुंद देशमुख आदी उपस्थित होते.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मतदारांचा आशीर्वाद घेऊन दिल्लीत शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याची ग्वाही नवनीत राणा यांनी दिली. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी केली जाईल. प्रसंगी शेतकºयांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास मागेपुढे बघणार नाही, असा ठाम विश्वास नवनीत राणा यांनी मतदारांना दिला. निराधार महिला, पुरुषांना ६०० ऐवजी दोन हजार रुपये मानधन मिळण्याकरिता शासनाविरुद्ध एल्गार पुकारला जाईल. आमदार यशोमती ठाकूर आणि मी आम्ही दोघीही सोबतीने तिवस्यात विकासाची गंगा आणली जाईल, असे त्या म्हणाल्या.सुनील शेट्टी म्हणाला, सभी नटो का एक ही पाना...महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुºहा येथे बुधवारी जाहीर सभेत अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सुनील शेट्टी व्यासपीठावर येताच एकच जल्लोष झाला. त्यांची छबी टिपण्यासाठी एकाच वेळी हजारो मोबाइल सरसावले. दरम्यान अभिनेता शेट्टी यांच्या ‘सभी नटो का एकही पाना, चुनकर लाना है नवनीत राणा’ असा संवादाला उपस्थित हजारो मतदारांनी टाळांच्या कडकडाट केला.वडाळी, किरणनगर भागाचा विकास करूअमरावती शहरातील वडाळी, किरणनगर भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव निधी आणला जाईल. वडाळी तलाव, छत्री तलावाच्या धर्तीवर किरणनगरात भव्यदिव्य उद्यानाची निर्मिती करण्याची ग्वाही नवनीत रवि राणा यांनी वडाळी, किरणनगर येथील प्रचार सभेत दिली. बेलोरा विमानतळाची रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्या म्हणाल्या.लोकसभेच्या पटलावर तापी धरण येऊ देणार नाहीधारणी : मेळघाटवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या तापी धरणाचा मी पुरेपूर विरोध करीन आणि लोकसभेत हा मुद्दा येऊच देणार नाही, अशी ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथे दिली. अभिनेता सुनील शेट्टी यांनी सभेपूर्वी १० च्या सुमारास धारणीच्या प्रमुख मार्गाने रोड शो केला. नवनीत राणा यांना बळ द्या, मी पुन्हा मेळघाटात येईल, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019