शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर उलटला, २५ हजार लीटर आॅईल रस्त्यावर

By admin | Updated: June 22, 2017 00:08 IST

स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ईल्ड आॅईल घेऊन जाणारा भरधाव टँकर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता नागपूर राज्य मार्गावर गौरी ईन हॉटेलजवळ घडली.

नागपूर मार्गावरील घटना : नागरिकांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ईल्ड आॅईल घेऊन जाणारा भरधाव टँकर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता नागपूर राज्य मार्गावर गौरी ईन हॉटेलजवळ घडली. या अपघातात चालक आसिफ अली मोहम्मद शेख (३२) व वाहक अतऊला नबी हुसेन (२५,दोन्ही राहणार वडाळा, मुंबई) हे दोघे जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सूत्रानुसार गुजरातच्या बडोदा शहरातून ईल्ड आईल घेऊन एम.एच.४९ ए.आर.-१८९१ क्रमांकाचा टँकर नागपूर येथील खापर्डीकडे जात होता. बुधवारी सकाळी ६ वाजता टँकर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव टँकर उलटला.चालक किरकोळ जखमीअमरावती : या अपघातात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय बळीराम राठोड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. त्यावेळी टँकरमधील आॅईलची मोठ्या प्रमाणात गळती सुरु होती. या टँकरमध्ये २५ हजार लीटर ईल्ड आॅईल होते. टँकर उलटल्याने ते आॅईल रस्त्यावर पसरले. पोलिसांनी टँकर सरळ करण्यासाठी क्रेनची मदत घेतली. क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. आॅईल गोळा करण्यासाठी झुंबडटँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील आॅईलचे लोट रस्त्यावरून वाहू लागले. ही बाब कर्णोपकर्णी होताच आसपासच्या नागरिकांनी डबक्या, बाटल्या घेऊन घटनास्थळी गर्दी करून रस्त्यावरून वाहून जाणारे मिळेल तेवढे आॅईल गोळा केले. अपघातानंतर बराच वेळ नागरिकांची आॅईल गोळा करण्यासाठी झुंबड उडाली होती.