शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावच्या शतकोत्तर शंकरपटावर सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:50 IST

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे.

ठळक मुद्देपटाच्या ३०० बैलजोड्या नांगरणीला : रौनक मावळली, शेतकºयांमध्ये नैराश्य

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे / तळेगाव दशासर : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे यात सहभागी होणाऱ्या ३०० बैलजोड्या शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामाला लावल्या आहेत़राज्यातील सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गत सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती़ त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शंकरपटावर बंदी घातली. स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरुवात केली़ त्यानंतर बापूसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून ठेवला.या पटासाठी शेतकरी खास बैल तयार करीत होते. शंकरपटात धावणाऱ्या बैलांना राजा-सर्जा, शेरू-विरू, राजा-रॉकेट, शेरा-बादल, अशी नावे दिली जायची. घरातही पटशौकीन ही नावे आपल्या बैलांना वापरत असत. या बंदीमुळे पटशौकीनांत निरूत्साह दिसत आहे़महिलांमध्ये नाराजीपुरुषांप्रमाणेच महिलांचाही या शंकरपटात सहभागअसायचा. महिला राखीव पटात जोड्या जुंपणे, हाकणे, संचालन, घड्याळाची नोंद, जोड्यांची नोंदणी, निकाल, बक्षीस वितरण व स्वयंसेवक या सगळ्या भूमिका महिलाच पार पाडत असत़ देशातील हा अभिनव उपक्रम तळेगावातच राबविला जायचा. त्यामुळेच देशविदेशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया या शंकरपटाची दखल घेत होते.तीन दाणी शंकरपटनानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या उत्तरेस गायरानमध्ये शंकरपट भरविण्यास सुरूवात केली़ त्यावेळी दो-दाणी एकदिवसीय शंकरपट होता़ दो-दाणी म्हणजे दोन दाणीवरून दोन बैलजोड्या एकाचवेळी सोडणे यातील जी जोडी कमी वेळेत अंतर पार करेल तिला बक्षीस, असे स्वरूप होते़ पुढे पटातील सहभागी जोड्यांची संख्या लक्षात घेता यात तीन गट पाडण्यात आले होते़ त्याला तीन दाणी म्हणतात.शौकीनांत निरुत्साहसर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यामुळे या परिसरावरील ग्रामीण भागातील अर्थकारणावर मोठा परिणाम दिसून आला आहे़ शंकरपटावर हाकण्यात येणारे बैल आता नांगर व बंडीला जुंपावे लागत आहे़ गतवर्षी केंद्र सराकरने शंकरपटाला मंजुरी प्रधान केली होती़ त्यामुळे पट शौकीनांमध्ये उत्साह दिसत होता़ ‘पेटा’ ही संघटना न्यायालयात गेली आहे.