शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खासगीतील शिक्षक झेडपीत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:03 IST

खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार आहे.

ठळक मुद्देशासनाचे धोरण : शिक्षण विभागात आदेश धडकलेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार आहे.जिल्हा परिषद प्रशासनास डिसेंबर २०१७ मध्ये खासगी अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना झेडपीमध्ये हजर करून घेणे आणि नियुक्ती देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. परंतु झेडपीने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे गुरुवार ३१ आॅगस्ट रोजी पुन्हा अशा शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. शिक्षण विभागाने जिल्हानिहाय जिल्हा परिषदेला खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची यादी पाठवलेली आहे. त्यांची ज्येष्ठता यादी बनवावी त्यापैकी किती शिक्षकांची जिल्हा परिषद रिक्त जागांवर आवश्यकता आहे. हे निश्चित करावे आणि ज्येष्ठतम शिक्षकांना सामावून घ्यावे. शिक्षकांची यादी शालेय शिक्षण विभागाला पाठवावी. समायोजित शिक्षकांना तत्काळ रुजू होण्यासंबंधी सीईओ स्तरावरून आदेशित करण्याबाबत कळवण्यात आले आहे. शिक्षकांना पदस्थापना देताना अवघड क्षेत्रातील गरोदर महिला व स्तनदा माता तसेच संवर्ग १ मध्ये मोडणारे जे शिक्षक रॅण्डमायझेशन राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात गेले आहेत. अशा शिक्षकांना त्या ठिकाणी पदस्थापना देऊन त्यांच्या जागी खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना पदस्थापना देण्याचे सूचित करण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षक समितीचा विरोधअनेक वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील प्रत्येक तुकडीस स्वतंत्र शिक्षक, शाळांसाठी विषयानुरूप आवश्यक शिक्षक, स्वतंत्र मुख्याध्यापक या माध्यमातून निकष ठरवून सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळात जे शिक्षक अतिरिक्त ठरत आहे, त्यांना प्रथम समायोजित करावे, अशी मागणी करीत खासगी अनुदानित शिक्षकांना झेडपी शाळांत समायोजन करण्यास आमचा विरोध असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य सरचिटणीस, विजय कोंबे, राजेश सावरकर यांनी सांगितले.खासगी अनुदानित आदी शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजर करून घेण्याचे आदेशही ग्रामविकास विभागाने शिक्षण विभागाला दिले आहेत. योग्य अंमलबजावणी केली जाईल.- आर.डी. तुरणकर,शिक्षणाधिकारी प्राथमिक