शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साईबाबा ट्रस्टवर फौजदारी कारवाई करा

By admin | Updated: March 27, 2015 00:00 IST

स्थानिक साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बगिच्याला सार्वजनिक करण्यासाठी महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली आहे.

अमरावती : स्थानिक साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बगिच्याला सार्वजनिक करण्यासाठी महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली आहे. या नोटीसवर तीन दिवसांत अंमलबजावणी न केल्यास ट्रस्टच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र, ट्रस्टने कोणताच पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टचे माजी सेवानिवृत्त व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी केली आहे. साईनगरयेथील साईबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांनी बगिचा आणि सार्वजनिक वापराचे भूखंड तर हडपलेच. परंंतु या सार्वजनिक भूखंडावर वाणिज्य वापराचे उपक्रम वर्षानुवर्षे शासनाचा महसूल बुडविला आहे. भूखंड १२४ सुरेख बगिच्यासाठी आरक्षित आहे. परंतु ही जागा सार्वजनिक उपयोगाची असल्याचे तथ्य माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. या बगिचामधून ट्रस्टच्यावतीने नागरिकांकडून प्रवेश शुल्काशिवाय मनोरंजन शुल्क आकारले जातात. त्यामुळे महापालिकेने हा बगिचा सार्वजनिक घोषित करावा, अशी मागणी ढगे यांनी केली आहे. याप्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी २ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात सातुर्णा सर्वे क्र.३३ च्या अभिन्यासात सार्वजनिक जागेवरून ट्रस्टचे नाव हटवून महापालिकेच्या नावाचा फलक लावण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी साईबाबा ट्रस्टचे सेवानिवृत्त प्रबंधक अविनाश ढगे यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीनुसार, सदर बगिच्याची जागा वास्तवात सार्वजनिक उपयोगाची आहे. तरीही ट्रस्टने या बगिचातून उत्पन्न घेतले. याच आधारे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ट्रस्टला अतिक्रमणाची नोटीस जारी केली.