पालकमंत्री : चांदूररेल्वेत अभियानांतर्गत महाशिबिरचांदूररेल्वे : शासनाद्वारा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आलेत. या योजनांचा उपक्रमांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केले. चांदूररेल्वे येथे महाराजस्व अभियानाच्या महाशिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगराध्यक्ष अभिजित सराड, मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील, उपविभागीय अधिकारी जर्नादन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीनिवास घाडगे, तहसीलदार राजगडकर, मुख्याधिकारी गीता ठाकरे आदी उपस्थित होते.महाराजस्व अभियान, समाधान शिबिरामधून अनेकांची प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहे. एकाच छताखाली येऊन गरजूंना त्यांच्या दारात जाऊन न्याय देता येतो. शेवटच्या माणसांपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात येत आहेत. अनेक वषार्पांसून प्रलंबित प्रश्न यानिमित्ताने सोडविण्यात येत आहेत, असे ना. पोटे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)सबलीकरण सप्ताहानिमित्त विविध स्टॉल ला भेटराज्यात १ ते ७ आॅगस्टपर्यंत महिला सबलीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांवर आधारित विविध विभागाने यादव मंगल कार्यालयात स्टॉल उभारले होते. त्याची पाहणी पालकमंत्री पोटे यांच्यासह सर्व उपस्थितांनी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटपराष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारांचे धनादेश देण्यात आले. ५ बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये फिरता निधी कर्ज वाटप, वन्य प्राण्यांद्वारा पिकांचे नुकसान केले आहे. अशा ८ शेतकऱ्यांना ८३ हजार ३८७ रुपये धनादेश देण्यात आले.समृद्धी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांशी संवादसमृद्धी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या ८०० हेक्टर जमीन अधिग्रहित करणार आहेत. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना नांदगाव पेठ व नांदगाव खंडेश्वर येथील एमआईडीसीमध्ये २५ हेक्टर जमीन परत मिळणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
राजस्व अभियानाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 23:59 IST