शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदारांच्या शिकवणी वर्गांवर कारवाई करा

By admin | Updated: July 21, 2016 00:07 IST

नोकरदारांचे शिकवणी वर्ग त्वरीत बंद करा व त्यांच्यावर धाडी टाकून कारवाई करण्यात यावी, ....

टिचर्स असोसिएशन आक्रमक : शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदनअमरावती : नोकरदारांचे शिकवणी वर्ग त्वरीत बंद करा व त्यांच्यावर धाडी टाकून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड यांना निवेदन दिले. तासभार चाललेल्या चर्चेत टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.शिक्षण विभागाचा शासन निर्णयानुसार सेवेत असणाऱ्या शिक्षकांनी शिकवणी वर्ग घेऊ नये, तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शिकवणी वर्ग फोफावले आहे. प्रोफशनल टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी अनेक मुद्दे शिक्षणाधिकाऱ्यांकडे उपस्थित केले आहे. यात संस्था चालकांनी सर्व शिक्षकांकडून नियमबाह्य खाजगी शिकवणी वर्ग घेत नसल्याचे हमीपत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी भरुन घ्यावे, शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये खासगी शिकवणीबाबतच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी एक वेगळा कक्ष निर्माण करुन ही जबाबदारी उपशिक्षणाधिकाऱ्यांवर द्यावी, कक्ष उघडल्याबाबतची प्रसिध्दी वर्तमानपत्रात द्यावी, नियमबाह्य शिकवणी वर्गाबाबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करावी, चौकशीमध्ये दोषी आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्था चालकांवर योग्य त्या कारवाईच्या सूचना द्याव्यात, जिल्हा स्तरावर शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समिती स्थापन करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राज्याध्यक्ष बंडोपंत भुयार, सुनील मानकर, संदीप बुरंगे, अमर गेडाम, नरेंद्र काकणे, ज्ञानेश्वर हिरुळकर, स्वप्नील देशमुख, शशीकांत इखे आदी उपस्थित होते. अवैध शिकवणी वर्ग राजरोसपणे सुरुचजिल्ह्यात राजरोसपणे अवैध शिकवणी वर्ग सुरुच आहे. या अवैध शिकवणी वर्गांना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांच्या अवैध शिकवणी वर्गांवर रोष वाढला आहे. हजारो रुपये महिन्याकाठी वेतन व शिकवणीचे येत आहेत.शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासनजर कुणी अवैध शिकवणी वर्ग घेत असले तर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड, यांनी बेरोजगार शिक्षकांना दिले.