शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मांडवा झोपडपट्टी अग्निकांडातील दोषींवर कारवाई करा

By admin | Updated: January 3, 2016 00:40 IST

बजरंग नगरातील मांडवा झोपडपट्टीत अग्निकांड घडविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी झोपडपट्टीवासीयांनी नगरसेवक प्रदीप दंदे यांच्या...

निवेदन : बजरंगनगर, झोपडपट्टीवासीयांची पोलीस आयुक्तांना मागणी अमरावती : बजरंग नगरातील मांडवा झोपडपट्टीत अग्निकांड घडविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी झोपडपट्टीवासीयांनी नगरसेवक प्रदीप दंदे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना बुधवारी निवेदनातून केली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा झोपडपट्टीला बुधवारी रात्री आग लागली. यामध्ये तब्बल ३१ झोपड्या जळून खाक झाल्यात. ११२ रहिवासी नागरिक बेघर झालेत. नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंसह रोजगारीचे साधनेही आगीत जळून खाक झाले. प्रशासनाकडून आगग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. मात्र, ही आग कुणीतरी समाजकंटकाने लावल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यासंदर्भात नगरसेवक प्रदीप दंदे यांनी शनिवारी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची भेट घेऊन बेघरांना न्याय देण्यासंदर्भात निवेदन दिले. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून १ महिन्यांपूर्वी झोपडपट्टी अनिधिकृत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. एके दिवशी चारचाकी वाहनातून आलेल्या १५ ते २० युवकांनी जागा खाली करण्यासंदर्भात त्यांना धमकावले होते. त्यानंतर ३० डिसेंबरला झोपडपट्टीला आग लागली. दोन दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी पुन्हा त्यांना पूर्ण झोपडपट्टी जाळण्यासंदर्भात धमकी दिल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच झोपडपट्टीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी सुधीर इंगळे, लीला चव्हाण, संतोष गवई, बेबी गवई, शरद इंगळे, मंगेश वानखडे, विनोद तायडे, भीमराव धंदर, किशोर डोंगरे, नर्मदा तायडे, सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते.