शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

घरकूल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:45 IST

तीव्र उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, शहरातील ज्येष्ठ नागरिक गौतम जवंजाळ हे घरकूल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी १ मेपासून न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकाचे उपोषण : मुख्याधिकाऱ्यांची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तीव्र उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, शहरातील ज्येष्ठ नागरिक गौतम जवंजाळ हे घरकूल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी १ मेपासून न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत. अहवालातील दोषी अधिकारी, पदाधिकाºयांच्या नावाचे छोटे-छोटे फलक तयार करून त्यांनी ते न.प. प्रवेशद्वारावर तोरणासमान बांधल्यामुळे लक्षवेधक ठरले आहे.शासनाच्या घरकुल योजनेत गोरगरिबांना हक्काचे घर प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु, येथील नगर परिषदेत या योजनेत खरे लाभार्थी पात्र ठरविण्याऐवजी कागदपत्रांची योग्य छाननी न करता अपात्र नागरिकांंना लाभ देण्यात आला. सदर घरकुल घोटाळा बाहेर काढण्यासाठी गौतम अण्णाजी जवंजाळ १० वर्षांपासून सतत लढा देत आहेत. यातील दोषींवर फौजदारी कारवाईसाठी गौतम जवंजाळ यांनी दोन वेळा उपोषण तसेच आंदोलने केली. त्याबाबत पुरावे दिलेत. मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांचे पत्र आले. अहवाल तयार झाला. जिल्हाधिकाºयांच्या अहवालात दोषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सर्व्हे एजन्सीचे नाव असून, मुख्याधिकाºयांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावामुळे व अधिकारी-कर्मचारी यांना वाचविण्यासाठी मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गौतम जवंजाळ यांनी केला आहे.एका नगरसेवकाची मध्यस्थी?गौतम जवंजाळ राहतात, त्या नगरातील एका नगरसेवकाच्या माध्यमातून उपोषण सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी जवंजाळ यांच्या घरच्यांना समजविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.