शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सरोज कॉलनीतून तडीपाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:13 IST

सिटी कोतवाली पोलिसांची तीन ऑटोचालकांविरुद्ध कारवाई अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर ऑटो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटी कोतवाली ...

सिटी कोतवाली पोलिसांची तीन ऑटोचालकांविरुद्ध कारवाई

अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर ऑटो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तीन ऑटोचालकाविरुद्ध २२ मार्च रोजी गुन्हा नोंदविला.

ही कारवाई जयस्तंभ चौकात करण्यात आली. आरोपी दिनेश प्रभाकरराव गुन्हाने (४३, प्रभात कॉलनी), मो. फिरोज मो. अब्दुल (४०, रा. बिस्मिल्लानगर) , मो. फिरोज मो. अय्यर कुरेशी (५८, रा. नमुना गल्ली न. २) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.

-----------------

वरली अड्ड्यावर धाड, दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

बडनेरा : नजीकच्या अंजनगाव बारी चौकात बडनेरा पोलिसांनी धाड वरलीच्या चिठ्ठ्यांसह १९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ मार्च रोजी सायंकाळी करण्यात आली. आरोपी निरंजन रामदास गरूड (३४) वसंता सुखदेव बन्सोड (३७), राजू शेवतकर विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.

--------------------------

दसरा मैदानात वरली मटक्यावर धाड

अमरावती : राजापेठ पोलिसांनी दसरा मैदानालगत झोपडपट्टीत धाड टाकून वरलीच्या चिठ्ठांसह ७६० रुपयांचे मुद्देमाल २२ मार्च रोजी जप्त केला. यात आदित्य अनिल वानखडे (४०), बंडू सरोदे रा. लढ्ढा प्लॉट) सह एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नायक पोलीस शिपाई नीलेश गुन्हाने, वानखडे यांनी केली.

-----------

१७५० रुपयांचा जुगार पकडला

अमरावती : नागपुरी गेट पोलिसांनी यास्मीननगर झोपडपट्टीत २२ मार्च रोजी धाड टाकून १७५० रुपयांचा जुगार पकडला. यात साबीर अली मो. अली (४०, रा. नूरनगर), सुधाकर कवलुजी कुंभलकर (५३, हमालपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.

---------------

परिहारपुऱ्यातून १०३० रुपयांची दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी परिहार पुऱ्यात कारवाई करून १०३० रुपयांची अवैध दारू २२ मार्च रोजी जप्त केली. यामध्ये मनोज मोहन बेनीवाल (४६) विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.

---------------

चिंचोली फाट्यावरून अवैध दारू जप्त

अमरावती : वलगाव पोलिसांनी चिंचोली फाट्यावर अवैध दरू वाहून नेताना मोपेड वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले. ही घटना २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता चिंचोली फाट्यावर घडली. पोलिसांनी अतुल रामकृष्ण हरडे (४०, रा. शिराळा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

मायानगरातून अवैध देशी दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी २२ मार्च रोजी मायानगरात धाड टाकून १३२६ रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली. यातील आरोपी विलास केशवराव बानोस्कर (३८, कुंभारवाडा) हा फरार असल्याचे पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली आहे.