शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तडीपार गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST

--------------------------- जिल्हा सामान्य रुग्णालयात अकारण जमाव अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अकारण जमाव करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी ...

---------------------------

जिल्हा सामान्य रुग्णालयात अकारण जमाव

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अकारण जमाव करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी १० मे रोजी गुन्हा नोंदविला. यामध्ये सागर यादव, ललित यादव, सूरज तिवारी, पवन श्रीवास्तव, सचिन उईके व तीन ते चार महिलांचा समावेश आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

---------------------

संचारबंदीचे उल्लंघन, दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदीच्या काळात एमएच २७ बीएच ८६२७ क्रमांकाच्या दुचाकीने विनामास्क फिरताना आढळलेल्या अब्दुल हाफिज अब्दुल गफार (३५, रा. अकबरनगर) याच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी कारवाई केली. एमएच २७ बीवाय ८९७९ क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणारा रवि चंदुलाल खत्री (४०, रा. केवल कॉलनी) याच्याविरुद्ध गाडगे नगर पोलिसांनी कारवाई केली.

--------------------------

चिंचपूर येथील युवकाची विष प्राशून आत्महत्या

मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या चिंचपूर येथील हर्षल बंडुजी तुळसकर (२१) या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी प्रतीक खोडके (रा. गोपालनगर) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी मर्ग दाखल केला.

------------------

अवैध मद्य बाळगणाऱ्या युवकविरुद्ध गुन्हा

भातकुली : हरताळा ते कोल्हापूर मार्गावर भातकुली पोलिसांनी गोविंद रमेश चव्हाण (३९, रा. हरताळा) याची तपासणी केली. त्याच्याकडे २२ नग देशी दारूच्या ११०० रुपयांच्या पावट्या आढळल्या. भातकुली पोलिसांनी मंगळवारी दुपारी कलम ६५ ई अन्वये गुन्हा नोंदवून त्याला समाजपत्रावर सोडले.

--------------------

संचारबंदीचे उल्लंघन, भातकुलीत गुन्हा

भातकुली : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भातकुली पोलिसांनी गजानन विनायकराव मोहोड (३९, रा. आसरा), शुभम अजाबराव मानकर (२२, रा. सायत) व आशिष सहदेवराव डोंगरे (२२, रा. सायत) यांच्याविरुद्ध कारवाई केली. मंगळवारी दुपारी त्यांच्याविरुद्ध कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

---------------

विनामास्क आढळलेल्या युवकांविरुद्ध विरुद्ध गुन्हा

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क आढळलेल्या राकेश सुनील पांडे (४२, रा. फ्रेजरपुरा) व संदीप शंकर चौधरी (३२, रा. ग्रीन पार्क कॉलनी) यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८ सह साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

-----------------

थुंकण्यास हटकले म्हणून महिलेला मारहाण

अमरावती : थुंकण्यास हटकले म्हणून कल्याणनगर येथील २५ वर्षीय महिलेला येथीलच नीलेश पिवाल व तीन महिलांनी शिवीगाळ करून मारहाण केली. परिसरातील महिला मध्यस्थीला आल्या असता, त्यांनाही पाहून घेण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी भादंविचे कलम २९४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

-------------------

सुकळी शिवारातून महावितरणचे साहित्य लंपास

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी शिवारातील महावितरणच्या डीबीमधील तांब्याचा बस बार, एचआरसी फ्युज, लघुदाब वाहिनीचा १४०० मीटर तार असे ३० हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी रहाटगाव ग्रामीण महावितरण केंद्राचे वरिष्ठ तंत्रज्ञ अतुल बोकाडे (४८) यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ सह कलम १३६ विद्युत अधिनियम २००३ अन्वये गुन्हा नोंदविला.