शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णानगरला शासनाचा प्रतिकात्मक अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:22 IST

गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही.

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही. यामुळे भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व अंत्यविधी केला.पूर्णानगर व परिसरातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला. याप्रकरणी कृषी विभागाद्वारा कोणतीही हालचाल न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्यात. त्यानंतर जिल्हा समितीने पाहणी केली असता, कपाशीचे ९६ टक्के बोंडे किडली असल्याचा अहवाल शासनाला दिला. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी कोणताही शासनादेश झालेला नाही. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरविला. कृषी विभागातील समितीच्या अहवालानुसार या परिसरातील शेतकऱ्यांचे एकरी किमान सव्वा लाख रुपये नुकसान झाले असताना, बियाणे कंपनी किंवा शासनाने शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी निषेधाच्या घोषणा देत तत्काळ भरपाईची मागणी केली. आंदोलनात बीटी बोंडअळी त्रस्त समितीचे उमेश महिंगे, संजय माकोडे, प्रमोद इटके, अंकुश जुनघरे, कळसकर गुरूजी, हरिभाऊ तायडे, विजय गुंडाले, छोटू देशमुख आदी उपस्थित होते.बाधित खरीप अन् शेतकऱ्यांचा आक्रोशयंदाचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसामुळे बाधित झाल्याने मूग, उडीद व सोयाबीन उद्ध्वस्त झाले. यामधून जी पिके वाचलीत, त्या शेतमालास हमीभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा हल्ला झाल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही निघणे मुश्कील झाले आहे.