शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब पुष्प ठरले हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक

By admin | Updated: September 22, 2016 00:20 IST

शहरातील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासून गणेशभक्तांना गुलाबपुष्प देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.

आदर्श उपक्रम : सामाजिक एकोप्याचे दर्शननांदगाव खंडेश्वर : शहरातील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासून गणेशभक्तांना गुलाबपुष्प देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. त्यामुळे याप्रसंगी जणूकाही गुलाबपुष्पच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक ठरल्याचे दिसून आले. नांदगाव नगरपंचायतीचे आरोग्य सभापती फिरोजखान यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुढाकार घेवून शहरामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांची एकता अबाधित रहावी, यासाठी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. शहरातील बारीपुरा येथे गणेश मंडळातील सदस्यांना गुलाब पुष्प देवून मुस्लिम बांधवांनी गणेशभक्तांचे स्वागत केले. यामधून जनसामान्यांमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. असाच सामाजिक सलोखा सदैव कायम रहावा व हिंदू-मुस्लिम एकत्रिकरण अबाधित रहावे, असा सूर गणेशभक्तांच्या चर्चेतून ऐकू येत होता. सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आरोग्य सभापती फिरोज खान यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही गणेशभक्तांनी कौतुक केले. यावेळी फिरोज खान यांचेसह पोलीस निरीक्षक अमित वानखडे, तहसीलदार बी.व्ही.वाहुरवाघ, जब्बारअली, देवीदास सुने, मो. गफ्फार, मो. राजीक, मो. नसीम, मो. ताबीरा, मो. दानिश, नावेद खान, मो. तौसिफ, मो. अबरार, शेख नईम, शेख तन्वीर, मो. कलीम, शेख रमीज इत्यादी नागरिक उपस्थित होते. धार्मिकतेच्या मुद्यांवरून एकीकडे काही ठिकाणी वाद निर्माण होतात. तणाव निर्माण होतो. प्रसंगी हाणामारीही होते. अशी स्थिती असताना नांदगाव शहरात मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)