शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूची स्वॅब किट उपलब्ध नाही, निदान होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:22 IST

जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, मात्र, शासकीय यंत्रणेजवळ स्वॅब किटच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तपासणीसाठी आता खासगी क्षेत्रात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाची अनास्था : रुग्णांची खासगी क्षेत्राकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, मात्र, शासकीय यंत्रणेजवळ स्वॅब किटच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तपासणीसाठी आता खासगी क्षेत्रात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.'एच १ एन १' व्हायरसने उद्भवणारा स्वाईन फ्लू आजाराने राज्यभरात हळूहळू पाय पसरविले आहे. आतापर्यंत राज्यात १८१ जणांचे बळी गेले असून, ९०० वर रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची बाब पुढे आली होती. त्यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळून आलेत. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तीन जणांचे स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती. अमरावतीमध्येही मागील वर्षांत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, काहींचे मृत्यू झालेत आहे.स्थानिक आरोग्य प्रशासनाला मध्यंतरी पीडिएमसी व एका खासगी रुग्णालयातील संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, स्वॅब किट नसल्यामुळे त्या रुग्णांची नोंद घेतली गेली नाही. काही दिवसांपूर्वीच बालाजी प्लॉट परिसरात स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले होते. शुक्रवारी शहरातील आणखी एका खासगी रुग्णालयात संशयित रुग्ण आढळून आला असून, त्यासंबंधाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मात्र, किटच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले.स्वाईन फ्लूची स्वॅब किट आरोग्य विभागाकडे नाहीत, त्यांना किटच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. खासगी क्षेत्रातून किट बोलावण्यात आल्या असून अद्याप त्या प्राप्त झालेल्या नाहीत.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक