शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

By admin | Updated: September 21, 2016 00:10 IST

‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे.

एफडीएची भूमिका संदिग्ध ? : अनेक नियमांचे उल्लंघन, तरीही दुर्लक्षअमरावती : ‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या मिठाईवर दराचे ‘स्टिकर्स’ लावले जातात. मात्र ‘एक्सापायरी डेट’ व मिठाईतील घटकांची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) केव्हा करणार? सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्याचे सेवन २४ किंवा ४८ तासांत करणेच योग्य असते. जर ती मिठाई ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे, अशा महत्त्वाच्या सूचना एफडीएकडून मिठाई व्यावसायिकांना दिल्या जातात. दर तगडे, नियम धाब्यावरअमरावती : या दुग्धजन्य मिठाईत सूक्ष्मजीव व जिवाणू वाढीस लागण्याची प्रक्रिया गतिमान असते. त्यामुळे अशी मिठाई खाणे आरोग्याला हानिकारक ठरते. रघुवीरमधील शीतकपाटात ठेवलेले पदार्थ ताजे आहेत का, ते किती दिवसाचे आहेत, याची नियमित तपासणी केली जाते की नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. ब्रेड, दूध, डोनट व पॅकिंग केलेल्या अन्य दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादन व 'एक्सापायरी डेट' टाकणे विक्रेत्याला बंधनकारक असते. या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, याची माहितीसुद्धा पदार्थांवर नोंदविणे अनिवार्य असते. त्याप्रमाणे या पदार्थांवर उत्पादन व एक्सापायरी डेट सुद्धा टाकली जाते. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानात केवळ मिठाईच्या दराचे स्टिकर्सखेरीज अन्य कोणत्याही माहितीचे स्टिकर्स आढळून येत नाही. मिठाईचे तगडे दर आकारूनही ग्राहकांना उत्पादनबाद्दल माहिती दिली जात नाही. हा प्रकार ग्राहकांच्या हक्काला डावलणाराच आहे. अमरावतीकरांच्या भरवशावर गलेलठ्ठ झालेल्या रघुवीर प्रतिष्ठानने शहरात व शहराबाहेर प्रस्थ वाढविले आहेत. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असते. एफडीएच्या नियमावलीचे पालन त्यांच्याद्वारे पूर्णपणे केले जात नाही. मग एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त जयंत वाणे कारवाई का करीत नाहीत, हादेखील प्रश्नच आहे.कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होते काय ?खाद्यान्न तयार करणाऱ्या व ग्राहकांना खाद्यान्न पुरविणारे कर्मचारी निरोगी असणे आवश्यक आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणेही गरजेचे आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तर, त्यापासून संसर्ग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असते. मात्र, रघुवीरमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का? तेथील कर्मचारी निरोगी आहेत का, याबद्दल एफडीएने कधी चौकशी केली आहे काय, असा सवाल आता जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेथील कारागिरांची वैद्यकीय तपासणी होणेही आवश्यक असते. ते पदार्थ योग्य त्या तापमानात ठेवणे ही बाबही महत्त्वाची आहे. या सर्व बाबींकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या पदार्थांपासून विषबाधा झाल्यास उलटी, अतिसार, ताप व अन्य आजार हाऊ शकतात - स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशियन, अमरावती