शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोड वाणीने होतात व्यक्तिमत्त्वातही बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:37 IST

कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देअमृता गायगोले : विद्यार्थ्यांसाठी उलगडले गूढ

अमरावती : कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.कंटाळवाण्या आणि अल्पपयोगी शिक्षणातून विद्यार्थीप्रिय आणि आयुष्योपयोगी शिक्षणाचा प्रयोग अमरावतीत 'शाश्वत कन्सेप्ट स्कूल'च्या माध्यमातून रूजविणाऱ्या अमृता अतुल गायगोले यांच्या कार्याची दखल आता देशभरात घेतली जाऊ लागली आहे. त्या सांगतात, ज्यावेळी कुणी 'गोड बोलतात, गुड बोलतात' त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विचारप्रकियादेखील त्याच दिशेने कार्यरत होते. बोलणे ही मनोशारीरिक क्रिया असल्यामुळे सातत्याने संवेदनशील भाषेचा वापर केल्यास अवघे व्यक्तिमत्त्वच तसा आकार घेऊ लागते. हा अफलातून लाभ केवळ विचारपूर्वक बोलण्यामुळे प्राप्त होऊ शकतो.विद्यार्थ्यांनी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावल्यास, ते जे बोलतील ते उपयोगी आणि प्रभावी असेल. ते लाभकारकच असेल. विचारांशिवाय व्यक्त केलेले बोल समस्या निर्माण करू शकतात. तमाम विद्यार्थ्यांनी हे समीकरण पक्के लक्षात घ्यावे, त्याचा आवर्जून अंमल करावा, असे आवाहन अमृता यांनी केले.