शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

मिठाई चविष्ट, दर्जेदार किती ?

By admin | Updated: September 29, 2016 00:08 IST

अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती...

पारदर्शकता काय? : विश्वास एकतर्फीच !अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती या महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी जाताना अनेक धक्कादायक तत्थ्ये समोर येतात. 'रघुवीर'चा नाश्ता दर्जेदार असल्याचे अमरावतीकर मानत आले होते. तथापि दर्जा किती राखला जातो, हे 'लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने उघड झाले आहे. नजरेआड केवळ पैसा कमविण्याचा व्यापार येथेही चालतो. जसे कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आणि पेटीस याबाबत घडते तसेच मिठाईबाबतही घडते. रघुवीरची मिठाई उत्तमच, असा ज्यांचा विचार असेल त्यांनी त्यांचा विचार पुन्हा तपासून बघायला हवा. मिठाई निर्मितीत पारदर्शकता किती, हा मोठाच प्रश्न उपस्थित होतो. मिठाईतून तुमच्या पोटात नेमके काय चालले याचे छातीठोक उत्तर कुणीही देऊ शकत नाही. मिठाईचे इन्ग्रेडियन्ट काय, याची जराही माहिती सामान्य ग्राहकांना दिली जात नाही. व्यापार होतो तो केवळ विश्वासाच्याच भरवशावर. मिठाई खरेदी करताना विश्वास ठेवून तुम्हाला मिठाई दिली जात नाही. त्यासाठी रघुवीरने ठरविलेले पैसे अदा करावेच लागतात. परंतु तुम्हाला मात्र 'काय खातो?' हे विचारण्याची मुभा नाही. विश्वास ठेवूनच मिठाई सेवन करावी लागते. विश्वास हा व्यापार एकतर्फी आहे. चिल्ल्या-पिल्ल्यांच्या पोटातही जाणारी ही मिठाई निकोप असेल याची शाश्वती कोण देणार? रघुवीरचा नाश्ता न खाण्याचा भावी अधिकाऱ्यांचा संकल्पउपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी यासारखे अधिकारी ज्या स्पर्धा परीक्षेतून तयार होतात, त्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कणाऱ्या ८० सुविद्य विद्यार्थ्यांनी आता रघुवीरचा नाश्ता, मिठाई न खाण्याचा तसेच पार्सल न बोलविण्याचा संकल्प सोडला. तसा ठरावच त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करताना ते सांगतात, आम्ही उद्याचे अधिकारी आहोत. लोक भ्रष्टाचाराने वैतागले आहेत. नियम पाळलेच जावेत, यासाठी आम्ही आजच सतर्क असायलाच हवे. 'लोकमत'मुळे जनजागृतीला सुुरुवात झाली. सामन्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे काही प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. 'रघुवीर'च्या नाश्त्यात फकडी आणि झुरळ हे किटक आढल्याचे अनुभव आमच्यातील काहींचे आहेत. असा प्रकार घडल्यावर नाश्ता परत करून, राग व्यक्त करून विषयाला विराम दिला जातो. तथापि सामान्यांनी त्यांचे अधिकार वापरून प्रत्येकवेळी अशा मुद्यांची रीतसर तक्रार एफडीएला आणि पोलिसांना करायला हवी. पंचनामा करवून घ्यायला हवा. असे होत नाही. एफडीए अधिकाऱ्यांसमोर काजुच्या प्लेट पेश केल्या जातात. म्हणूनच अधिकारी कारवाई करीत नाहीत. रघुवीरसारख्यांचा धंदा त्यामुळेच फोफावतो. ग्राहक हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी आता प्रत्येक ग्राहकाने पुढे सरसावायला हवे. स्वत:ची लढाई स्वत: लढायला हवी. त्याचाच आरंभ म्हणून हा आमचा सामूहिक संकल्प आहे. प्रत्येक सदस्याने किमान दहा लोकांना जागे करण्याची शपथ आम्ही घेतली आहे. आम्ही ८० जण ८०० लोकांना जागे करू. 'खाणार नाही तर विकणार कसे?' हा आमचा मुलमंत्र असल्याचे या युवाशक्तीने स्पष्ट केले. 'अ‍ॅम्बिशन अ‍ॅकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा'च्यावतीने वैभव मस्के आणि इतरांनी त्यांची ही भूमिका 'लोकमत'ला कळविली. लोकमतच्या अभिनंदनाचा ठरावही या भावी अधिकाऱ्यांनी घेतला.