शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धूलिकणांवर स्वीपिंग मशीनचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:11 IST

शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला.

ठळक मुद्देअ‍ॅक्शन प्लॅन तयार : प्रदूषणावर उपाययोजनांसाठी महापालिकेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शुक्रवारी बैठकीत धूलिकणांचा नायनाट करण्यासाठी स्वीपिंग मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला.शहरातील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासंदर्भात शुक्रवारी महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या कक्षालगतच्या सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त हेमंत पवार, उपमहापौर संध्या टिकले, सभागृह नेता सुनील काळे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, उपआयुक्त महेश देशमुख, शहर अभियंता जीवन सदार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, अर्जुन ठोसरे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता व्ही.के. खातदेव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्निल लिंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद पाटणकर, मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र डकरे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहराचा सन २०१६-१७ मधील पर्यावरण स्थितीच्या अहवालात हवेची गुणवत्ता दुय्यम, आरएसपीएम (धुलीकण) प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक व ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी २०१७ मध्ये अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यासंबधाने उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध विभागांना कळविण्यात आले होते. मात्र, पर्यावरणातील प्रदूषणाबाबत फारशी दखल विविध विभागांनी घेतली नाही.दरम्यानच्या काळ्यात धूलिकणांचा प्रकोप वाढला आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याचा गंभीर मुद्दा ‘लोकमत’ने वृत्त मालीकेतून लोकदरबारी मांडला. वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनेसंदर्भात पाऊले उचलली. यामध्ये सर्वप्रथम राजापेठ रस्त्यावरील धूलिकणांचा मुद्दा गंभीरतेने घेण्यात आला. रस्त्यावरील खड्डे गिट्टीने बुजविण्यात आले, तर आता पुढेच्या उपाययोजनेत डांबरीकरण करण्याचे प्रावधानसुद्धा केले आहे.शहरातील अन्य परिसरातील धूलिकणांचा नायनाट करण्यासाठी स्वीपिंग मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अमरावती शहरातील प्रदूषणाचा स्तर नक्कीच खाली येईल आणि अमरावतीकरांना शुद्ध हवा मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.