शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

अंबादेवी मार्गावरील फुटपाथ व्यावसायिकांनी केले गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

अमरावती: राजकमल ते गांधी चौक अंबादेवीच्या मंदिराकडे जाणार रस्ता लाखो रुपये खर्च करून रुंद करण्यात आला. येथे फुटपाथही करण्यात ...

अमरावती: राजकमल ते गांधी चौक अंबादेवीच्या मंदिराकडे जाणार रस्ता लाखो रुपये खर्च करून रुंद करण्यात आला. येथे फुटपाथही करण्यात आले. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथ किरकोळ व्यवसायिकांनी गिळंकृत केल्या आहे. त्यामुळे येथे येणा-या वाहनचालकांनासुद्धा पार्किंगला जागा नसते. नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने या मार्गावरील वाहतुकीलासुद्धा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

राजकमल ते गांधी चौकाकडे जाणार हा महापालिकेचा रस्ता आहे. गेटच्या आतमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. लॉकडाऊनमध्ये बंद असलेले अंबा-एकवीरा देवीचे मंदिर अनलॉकमध्ये आता भाविकांना दर्शनासाठी खुले केल्याने या मार्गावर भाविकांचा राबता वाढला आहे.

परंतु गांधी चौककडे जाणाऱ्या मार्गावर किरकोळ व्यावसायिक, कपडे विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेत तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी राजरोजस फुटपाथवरच आपली दुकाने थाटून फुटपाथ गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. मार्गावर काही महत्त्वाच्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने असल्याने येथे खरेदीसाठी नागरिक येतात. परंतु त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले त्यांच्या समोरच वाहने उभी ठेवावी लागतात. त्यामुळे संपूर्ण रस्ता व्यापला जातो. इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडीसुद्धा होते. येथील फुटपथावर ज्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटला ती दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनविरोधी पथकाने काढून शहरातील नागरिकांना पायदळ चालण्याकरिता फुटपाथ मोकळे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

कोट आहे.