शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

महापालिका आयुक्तांची साक्ष विस्तार अधिकाºयांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:56 IST

खोटी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची मुंबईत साक्ष, तर शिक्षण विस्तार अधिकाºयाच्या निलंबनाचे आदेश विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिले.

ठळक मुद्देबोगस आदिवासी भरती रोखा : अनुसूचित जमाती कल्याण समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खोटी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची मुंबईत साक्ष, तर शिक्षण विस्तार अधिकाºयाच्या निलंबनाचे आदेश विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिले. साडेतीन तासांच्या बंदद्वार आढावा बैठकीत बहुतांश विभागांच्या कार्यप्रणालीवर समिती पदाधिकाºयांनी बोट ठेवले.गत तीन दिवस जिल्हा दौºयावर असलेल्या समितीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नव्या नियोजन भवनात शुक्रवारी आढावा बैठक घेतली. समितीचे प्रमुख आ. अशोक उईके अध्यक्षस्थानी होते. आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या योजना, उपक्रमांशी संबंधित विभागप्रमुखांनी समितीला माहिती सादर केली. २००६ मध्ये बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेत आदिवासींच्या नावे नोकरी बळकावणारे कर्मचारी कार्यरत असताना प्रशासनाने खोटी माहिती सादर केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. समितीचे सदस्य आ. श्रीकांत देशपांडे यांनी हा विषय प्रकर्षाने मांडताना महापालिका आयुक्तांना जबाबदार ठरविले. मुंबईत त्यांची साक्ष नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळघाटच्या दौºयावर असलेल्या समितीला चाकर्दा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या, आधार नोंदणीसह पायाभूत सुविधांचा अभाव जाणवला. तरीदेखील विस्तार अधिकाºयाने या आश्रमशाळेबाबत ‘ओके’ शेरा दिला. या अधिकाºयाचे निलंबन करण्याचे निर्देश अपर आयुक्त गिरीश सरोदे यांना मिळाले.योजनांचा सर्वंकष आढावाशुक्रवारी दुपारी निलंबनाची कार्यवाही झाली. दरम्यान डीबीटी नोंदणी, आधार कार्ड, शिष्यवृत्ती, विविध योजनांच्या दिरंगाईचा मुद्दा मांडला गेला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नव्याने आधार कार्ड तयार करण्याबाबतचे केंद्र पोस्टात देण्याबाबतचा निर्णय झाल्याचे समितीला सांगितले. आ. वैभव पिचड यांनी आश्रमशाळा, वसतिगृहांच्या गैरसोईचा विषय मांडला. आरोग्य सुविधांअभावी होणाºया आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरणांकडेही त्यांनी लक्ष वेधले. आढावा बैठकीला श्रीकांत देशपांडे, पास्कल धनारे, संजय पुराम, पंकज भोयर, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, अमित घोडा, संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग वरोरा, आनंद ठाकूर, चंद्रकांत रघुवंशी हे आमदार हजर होते. आढावा बैठकीनंतर आ. अशोक उईके यांच्यासह श्रीकांत देशपांडे, आनंद ठाकूर आदी सदस्यांनी येथील राधानगर स्थित मुलींचे वसतिगृह, गाडगेनगरातील मुलांच्या वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थी, विद्यार्थीनींसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. स्थानिक नवसारी रिंगरोडलगत असलेल्या महर्षि पब्लिक स्कूलमध्ये काही दिवसांपूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेला भेट देण्यात आली. या विद्यार्थ्याच्या मृत्यूची कारणमीमांसा समितीने जाणून घेतली.सहा महिन्यांत आधार लिंकआश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या आधार लिंकमध्ये अडचणी येत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला. आ. श्रीकांत देशपांडे यांनी आदिवासी विकास विभागाने सहा महिन्यांत समस्या सोडवावी, अशा सूचना केल्यात. १६ हजार विद्यार्थ्यांचे दोन महिन्यांतच आधार लिंक केले जातील, अशी ग्वाही एटीसी गिरीश सरोदे यांनी दिली.झेडपीतून सहा कोेटी परतआदिवासी विकास विभागाने पशुसंवर्धन, आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी दिलेले सहा कोटींचे अनुदान अखर्चित असल्याची बाब निदर्शनास आली. जागा नसल्याचे कारण पुढे करीत सहा कोटी परत गेल्याचे समितीला कळविले. जागा उपलब्ध असताना खोटी माहिती सादर करून दिशाभूल केली. याप्रकरणी बांधकाम विभागप्रमुखांची साक्ष मुंबईत नोंदविण्याचे निश्चित झाले आहे.तीन दिवसांच्या दौºयात काही प्रश्न, समस्या मार्गी लागल्या. बोगस आदिवासी भरती रोखण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. अखर्चित निधीची बाब निदर्शनास आणली.- अशोक उईके, समितीप्रमुख