शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

घरफोडी घडल्यास निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:43 IST

भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल.

ठळक मुद्देसीपींचा इशारा : 'प्लॅन आॅफ अ‍ॅक्शन' तयार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल. त्यांचे मॉनिटरिंग कमी असल्याचा निष्कर्ष काढून थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दिला आहे.मागील काही दिवसांपासून भरदिवसा सुरू असलेले घरफोडीचे सत्र पाहता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला असून त्याची अमंलबजावणी करण्याचे सक्त निर्देश पोलिसांना दिले आहेत. चोरांनी हायवेलगतचा परिसर टार्गेट केला असून दिवसाढवळ्या चोर घरफोडी करून पसार होत आहेत.आरोपी तलवारसिंगचा शोधअमरावती : मागील काही दिवसांत पंधरापेक्षा अधिक घरफोडीच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चोºया गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. चोरांनी नागरिकांसह पोलिसांची घरे सुद्धा सोडली नाहीत. घरफोडीच्या गुन्ह्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आता अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. चोरी व घरफोड्यांच्या घटनांबाबत सतर्क राहून कर्तव्य बजावण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत. तसेच पोलीस आयुक्त वायरलेसमार्फत पोलिसांना सुचना देत असून पोलीस यंत्रणा चोरांचा मागोवा घेण्याच्या कामी लागली आहे. प्रत्येक ठाण्यातील डीबी स्कॉडमध्ये पोलिसांना चोरीचा छडा लावण्यास सांगीतले आहे. कुख्यात आरोपी तलवारसिंगला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. आता तो कारागृहातून बाहेर आला आहे. त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले असावे, असा संशय पोलिसांना असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.चार्लींची गस्त पुन्हा सुरु होणारशहरात पूर्वी चार्ली कमांडो मोटरसायकलींवरून गस्त घालीत होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चार्लींची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा चार्ली कमांडोंना सक्रिय करण्यात आले असून गल्लीबोळातही गस्त सुरु राहणार आहे.सीआरओ व्हॅनच्या पोलिसांची परेडदिवसढवळ्या चोर घरफोड्या करून पसार होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतरही ‘सीआरओ व्हॅन’चे पोलीस घटनास्थळी पोहोचत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस वेळेवर पोहोचल्यास चोर हाती लागू शकतात. ही गंभीर बाब लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सीआरओ व्हॅनमधील पोलिसांची कानउघाडणी केली. ‘सीआरओ व्हॅन’च्या पोलिसांची अकार्यक्षमता पाहता त्यांच्यात स्फूर्ती निर्माण व्हावी, यासाठी त्यांची परेड घेऊन धावण्याचा सराव घेण्याचे निर्देश सीपींनी दिले आहेत.दिवसा नाकाबंदी, पेट्रोलिंग वाढविलेपोलिसांनी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत दिवसाच नाकाबंदी सुरु करून पेट्रोलिंग वाढविली आहे. नाकाबंदीदरम्यान महिलांना वगळून प्रत्येक संशयित व्यक्तीची तपासणी करण्याचे सक्त निर्देश सीपींनी दिले आहेत. चोरी करण्याचे साहित्य आढळल्यास त्याची सखोल चौकशी करण्याचे पोलिसांना बजावण्यात आले आहे.काय आहे अ‍ॅक्शन प्लॅनरेकार्डवरील व घरफोडीच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईजिल्ह्याभरातील रेकार्डवरील गुन्हेगारांची यादी तयारकारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर लक्षबसस्थानक, रेल्वेस्थानकावर लक्षसराफा व्यापाºयांवर लक्ष ठेवणेनागरिकांमध्ये जनजागृती करणेनागरिकांच्या बैठकी घेणेसीसीटीव्ही अनिवार्य करणेसुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करणेभंगार व्यावसायिकांची चौकशी करणेविविध ठिकाणी नाकाबंदी, ांशयितांची चौकशी करणे