शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटायझेशनला स्थगिती, सेटटॉपबॉक्समधून लूट सुरूच

By admin | Updated: January 10, 2016 00:13 IST

केबल ग्राहकांसाठी केलेल्या सेटटॉप बॉक्स सक्तीला हायकोर्टाने सहा आठवडे स्थगिती दिली असली तरी त्यानंतर सेट टॉप बॉक्स सक्तीची टांगती तलवार ...

केबल आॅपरेटरमध्ये ‘वॉर’ : सोशल मीडियात उलटसुलट चर्चाअमरावती : केबल ग्राहकांसाठी केलेल्या सेटटॉप बॉक्स सक्तीला हायकोर्टाने सहा आठवडे स्थगिती दिली असली तरी त्यानंतर सेट टॉप बॉक्स सक्तीची टांगती तलवार ग्राहकांवर कायम असल्याने केबल आॅपरेटर्सकडून बॉक्स जोडणीचे काम सुरूच आहे. ग्राहकांचा सेटटॉप बॉक्स जोडलीला विरोध नाही. मात्र यासाठी घेतल्या जाणाऱ्या अव्वाच्यासव्वा रकमेच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. करणमूक कर विभागाने दरांवर नियंत्रण ठेवण्याबाबत हात झटकल्याने केबल आॅपरेटर्सना आयती संधी मिळाली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या डिजिटायझेशनच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती अजून काही आठवडे आहे. मात्र दरम्यानच्या काळात सेट टॉप बॉक्स जोडणीचे काम केबल आॅपरेटर्सनी सुरूच ठेवल आहे. ३१ डिसेंबरनंतर केबल नेटवर्क पूर्णत: ठप्प झाले होते. त्यामुळे ग्राहकांकडून सेटटॉप बॉक्सच्या दराची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली. एक केबल नेटवर्क एका सेटटॉप बॉक्ससाठी १२०० तर दुसऱ्या सेटटॉप बॉक्ससाठी १५०० रुपये आकारला आहे. इंस्टॉलेशन आणि अ‍ॅक्टीव्हेशन चार्जेसच्या नावाखाली ३००-४०० रुपये प्रतिग्राहकांकडून वसूल केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. सोशल मीडियात गोंधळकेबल सेवा पुरविणाऱ्या बहुवैध यंत्रणा परिचालकांपैकी काहींनी सोशल मीडिया ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा वापर करत गोंधळात भर टाकली आहे. एकाकडून २०० रुपये प्रतिमहिना तर दुसऱ्याकडून १०० रुपये प्रति महिन्याची ग्वाही वा प्रलोभन दिले जात आहे. शहरातील दोन मुख्य केबल संचालकांमधील अंतर्गत हेव्यादाव्यांनी ग्राहकांची मात्र तारांबळ उडाली आहे. सेटटॉप बॉक्सची किंमत, दर्जा आणि अ‍ॅक्टीवेशन चार्जबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे. सेटटॉप बॉक्स जोडणीची घाई करुनका, असेही संदेश फिरत आहेत. त्यामुळे खरे काय? आणि खोटे काय? याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. जीटीपीएएच्या सेटटॉप बॉक्सवर २००० रुपये अशी किंमत अंकित आहे. मात्र त्याचे १५०० रुपये घेतले जात आहे.इन्स्टॉलेशन आणि अ‍ॅक्टिव्हेशन चार्जमध्येही मोठी तफावर आहे. त्यामुळे मूळची किंमत एक हजार रुपयांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे सक्तीच्या नावावर लूट होण्याचा धोका ग्राहक व्यक्त करीत आहेत. काही केबल आॅपरेटर्सनी स्वत:ची मनमानी दरांची आकारणी करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. (प्रतिनिधी)