शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

‘स्थगिती’वरून गदारोळ

By admin | Updated: June 17, 2014 23:59 IST

आमसभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून मंगळवारी महापालिकेत गदारोळ झाला. भाजप-सेना, बसपा-रिपाइं, राष्ट्रवादी फ्रंट एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जुंपली. गदारोळ सुरू

मित्र बनले शत्रू : गटनेता पदाच्या घोषणेवरुन राजकारणअमरावती : आमसभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून मंगळवारी महापालिकेत गदारोळ झाला. भाजप-सेना, बसपा-रिपाइं, राष्ट्रवादी फ्रंट एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जुंपली. गदारोळ सुरू असताना पीठासीन सभापती उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता म्हणून सुनील काळे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेवर आक्षेपही नोंदविला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या आमसभेत पीठासीनावर महापौर वंदना कंगाले, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, आयुक्त अरूण डोंगरे, नगरसचिव मदन तांबेकर हे विराजमान होते. आमसभेच्या प्रारंभीच भाजपाचे गटनेता संजय अग्रवाल यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या श्रध्दांजलीचे प्रस्ताव मंजूर करून सभा स्थगित करावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे, चेतन पवार, बाळू भुयार, मिलिंद बांबल यांनी अनुमोदन दिले. मात्र सभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून सुनील काळे यांनी आक्षेप घेतला. तेव्हा भाजप-सेना, रिपाइं, बसपा, जनविकास काँग्रेसचे सदस्य महापौरांच्या पीठासनासमोर एकत्र येऊन सभा स्थगित करण्याची मागणी करू लागले. एका बाजूने कामकाज सुरू रहावे तर दुसऱ्या बाजूने सभा स्थगित व्हावी हा वाद अर्धा तासपर्यंत सुरूच राहिला. अखेर महापौर वंदना कंगाले यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. महापौर कंगाले यांनी सभागृह सोडताच पाच ते सात मिनिटांच्या आत पीठासीनावर उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे विराजमान झाले. त्यांनी स्वत:हून कामकाज सुरू केले. गोंधळ सुरू असताना विभागीय आयुक्तांकडून आलेल्या पत्राचे त्यांनी वाचनही केले. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर चर्चेत तुषार भारतीय, प्रकाश बनसोड, चेतन पवार, विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, सुनील काळे, विजय नागपुरे, राजेंद्र तायडे, कांचन ग्रेसपुंजे, दीपक पाटील, रीना नंदा, सुजाता झाडे, वंदना हरणे, प्रशांत वानखडे, बबलू शेखावत यांनी सहभाग घेत मुंडे यांच्या कार्यकर्तुत्वाचा लेखाजोखा मांडला. या प्रस्तावानंतर सभा स्थगित करण्यात आली.