शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्षांच्या पत्नीसह तीन शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:46 IST

शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले.

ठळक मुद्देसीईओंची कारवाई : राजकीय दबाब, गैरहजर असल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले. तिघांपैकी दोघांनी बदली आदेश धुडकावत राजकीय दबाब आणल्याने, तर एक शिक्षक रुजू झाल्यानंतर सुटीवर गेला आहे. निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नी सुजाता मोटघरे यांच्यासह सुनील यावलीकर व संजय हिरूळकर या दोन शिक्षकांचा समावेश आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या पहिल्यांदाच राज्यस्तरावरून आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काहींना सोईच्या ठिकाणी, तर काहींना मेळघाटात बदली मिळाली. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण पसरले आहे. मेळघाटात बदली झालेल्या काही शिक्षकांनी तेथून बाहेर पडण्यासाठी राजकीय दडपण आणण्याचे प्रयत्न केले. लॉबिंग करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचेही टाळण्याचे प्रकार पुढे आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या निदर्शनास हा घटनाक्रम आला आहे. या बाबीची दखल घेत ४ आॅगस्ट रोजी आॅनलाइन जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत मेळघाटातील धारणी पंचायत समितीमधील गावांतील शाळांवर नियुक्ती मिळालेल्या सुजाता मोटघरे व सुनील यावलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बदली आदेशानंतरही शाळेवर रुजू न होता आदेश धुडकवण्यासाठी राजकीय दबाबतंत्राचा वापर केल्याचा ठपका या दोन शिक्षकांवर ठेवला आहे. संजय हिरूळकर नामक शिक्षक रंगुबेली शाळेवर रुजू झाले. मात्र, त्यानंतर सुटी टाकून गैरहजर असल्याने सीईओ मनीषा खत्री यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शिक्षण विभागाचे सूत्रांनी दिली. सीईओंच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सीईओंच्या धडक कारवाईची चर्चाजिल्हा परिषद शिक्षक बदली आदेश धुडकावत राजकीय दबाब आणल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नीसह अन्य दोन शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्याने जिल्हा परिषदेसह शिक्षकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे, या कारवाईबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.तीन शिक्षकांवर सीईओंनी केलेल्या निलंबन कारवाईची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर यासंदर्भात योग्य कारवाई केली जाईल.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषदमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तीन शिक्षकांचे निलंबनाचे आदेश शनिवारी काढले. सदर आदेश संबंधित पंचायत समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहेत.- वामन बोलकेउपशिक्षणाधिकारी प्राथमिक