शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘सायबरटेक’च्या ब्लॅकलिस्टला स्थगिती

By admin | Updated: May 6, 2017 00:08 IST

महापालिकेला ठेंगा दाखविणाऱ्या ‘सायबरटेक’ या एजंसीवर करण्यात आलेल्या ‘ब्लॅकलिस्ट’ कारवाईला न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.

निविदेचा मार्ग प्रशस्त : न्यायालयाचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेला ठेंगा दाखविणाऱ्या ‘सायबरटेक’ या एजंसीवर करण्यात आलेल्या ‘ब्लॅकलिस्ट’ कारवाईला न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. त्याचवेळी नव्याने निविदा प्रक्रिया करू नये, ही सायबरटेकची मागणी न्यायालयाने फेटाळल्याने जनरल असेसमेंटसंदर्भात पालिकेचा मार्ग प्रशस्त बनला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्या. भूषण गवई आणि ए.एन. चांदूरकर यांच्या खंडपीठाने ३ मे रोजी याप्रकरणी सुनावणी घेतली. त्यात मानवीय दृष्टिकोनातून सायबरटेकवर करण्यात आलेल्या ‘ब्लॅकलिस्ट’ या एकाच मुद्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती महापालिकेचे मूल्यनिर्धारण व कर संकलन अधिकारी महेश देशमुख यांनी दिली. ३० मार्च २०१७ च्या आयुक्तांच्या आदेशान्वये ठाणेस्थित "सायबरटेक सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड" या एजंसीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. यासोबतच सायबर टेकसोबतचा करारनामा रद्द करण्यात आला. शहरातील मालमत्तांचे पुनसर्वेक्षण व करनिर्धारणाचे काम सायबरटेकला २.६७ कोटी रुपयांमध्ये देण्यात आले होते. जनरल असेसमेंट पूर्ण झाल्यावर महापालिकेला १०० कोटी रूपये मालमत्ता करातून अपेक्षित होते. अर्थात महापालिकेची मागणी ४० कोटीहून १०० कोटींवर जाणे अपेक्षित होते. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये वर्षे आटोपल्यानंतरही सायबरटेकने कुठलेही ठोस काम केले नाही. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका सायबरटेकवर ठेवण्यात आला. करारनाम्यातील विविध अटींचा भंग आणि शून्य कामामुळे सायबरटेकला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. करारनामाही रद्द करण्यात आला. त्याविरुद्ध सायबरटेकने नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर ३ मे रोजी सुनावणी झाली. महापालिकेचेवतीने प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने ‘सायबरटेक’शी करारनामा रद्द करू नये आणि निविदा प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशा दोन्ही मागण्या फेटाळल्या. त्याचवेळी सायबरटेकचे अन्य ठिकाणची कामे अडचणीत येऊ नये म्हणून केवळ ‘ब्लॅकलिस्ट’ या एकमेव बाबीला स्थगिती दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली.१७ मे रोजी निविदासायबरटेकला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर महापालिकेने मालमत्तांचे सर्व्हेक्षण आणि कर निर्धारणासाठी पुन्हा ई-निविदा केली. त्यासाठी १८ एप्रिलला आॅनलाईन निविदा जाहीर करण्यात आली. ती निविदा १७ मे रोजी उघडण्यात येणार आहे. न्यायालयीन स्थगितीचा या निविदा प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.